CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

12 दिवसांत 8 जणांचा बुडून मृत्यू; CM प्रमोद सावंतांनी स्थानिक, पर्यटकांना केले महत्वाचे आवाहन

पावासाळ्यात पर्यटनासाठी बाहेर पडलेल्या लोकांसोबत घडलेल्या दुर्घटनांमुळे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्थानिक, पर्यटकांना महत्वाचे आवाहन केले आहे.

Pramod Yadav

मान्सूनचा मौसम सुरू झाला असून पावसाळी पर्यटनासाठी विविध ठिकाणी स्थानिक आणि पर्यटक गर्दी करत आहेत. गोव्यात मागील 12 दिवसांत विविध घटनांमध्ये आठ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. अलिकडेच मैनापी धबधबा येथे दोघांचा तर, कासावली येथील चेरेखाणीत एकाचा बुडून मृत्यू झाला आहे.

पावासाळ्यात पर्यटनासाठी बाहेर पडलेल्या लोकांसोबत घडलेल्या दुर्घटनांमुळे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्थानिक, पर्यटकांना महत्वाचे आवाहन केले आहे.

पावसाळ्यात धबधब्याची खोली समजत नाही. त्यामुळे युवकांनी दारू पिऊन धबधब्यांवर जाऊ नये. तसेच, पाण्यात उतरू नये असा सल्ला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे. समुदकिनाऱ्यावर देखील आंघोळीसाठी जाऊ नये असेही सावंत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, समुद्रावर दृष्टीचे जीवरक्षकही तैनात आहेत. सरकार सुरक्षात्मक सर्व प्रयत्न करत असले तरी नागरिकांनी धोकादायक जलाशयात जाऊ नये. असे आवाहन सावंत यांनी केले आहे.

मैनापी धबधबा दुर्घटनेनंतर आता पर्यटकांच्‍या सुरक्षेसाठी धबधब्‍यांवर पर्यटकांना ‘गाईड’ पुरवण्‍याची शिफारस वन खात्‍याला करण्यात आली आहे.

शनिवार, रविवारी धबधब्‍यांवर होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन या ठिकाणी जीवरक्षक व पोलिसही तैनात करण्‍याची शिफारस समाजकल्‍याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी केली.

सध्‍या पर्यटकांसाठी बंद केलेले धबधबे पुन्‍हा कधी सुरू करणार, याचा निर्णय गोव्‍याचे मुख्‍य वनपाल घेणार असल्‍याची माहिती वन खात्‍याकडून मिळाली आहे. शिवाय धबधब्‍याच्‍या ठिकाणी पर्यटकांसाठी आवश्‍‍यक असलेले सूचना फलक लावावेत, तसेच त्‍यांना लाईफ जॅकेटही पुरविण्‍याची सूचना केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT