Goa Monsoon 2023 Update Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023: राज्यात आगामी पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा

आयएमडीने जारी केला ऑरेंज अलर्ट

Akshay Nirmale

Goa Monsonn 2023 : भारतीय हवामान विभागाने (IMD) गोव्यासाठी आगामी पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यातही गोव्याच्या विविध भागांमध्ये 4 जुलै पर्यंत अतिवृष्टी होईल, असे विभागाने म्हटले आहे. आयएमडीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली.

गेल्या आठवड्याभरापासून गोव्यात पावसाने जोर धरला आहे. या किनारी राज्यात जुनचा सुरवातीचा कालावधी कोरडा गेला होता. जुनच्या पहिल्या एक ते चोविस जून या काळात पावसाची सरासरी अत्यंत कमी राहिली होती.

दरम्यान, आयएमडीने शुक्रवारच्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, किनारी भागात वारे वेगाने वाहतील. या संपुर्ण काळात मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, पावसाच्या या हंगामात एक जूनपासून ते आत्तापर्यंत मडगावमध्ये सर्वाधिक 792.2 मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती आहे.

आयएमडीने गोव्यासह कोकण किनारपट्टी, गुजरात, राजस्थानमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT