Salaulim Dam OverFlow Dainik Gomantak
गोवा

Salaulim Dam OverFlow: साळावली धरण 'ओव्हरफ्लो'; पर्यटकांना धरणावर जायचे असल्यास लागणार 'ही' गोष्ट

यावर्षी 2170 मिमी पाऊस झाल्यावर साळावळी धरण ओव्हरफ्लो झाले

Kavya Powar

Salaulim Dam Overflow: राज्यभरात पावसाने धुमशान घातले असून हवामान विभागातर्फे दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. परिणामी राज्यातील धरणे ओसंडून वाहू लागली आहेत. पर्यटकांचे आकर्षण असलेले साळावली धरणही आज सकाळपासून ओव्हरफ्लो झाले आहे.

यंदा पावसाचे उशीरा आगमन झाल्यामुळे अनेक धरणांतील पाणीसाठ्याचा गहन प्रश्न सरकारपुढे उभा राहिला होता. मात्र आता पावसाने जोर धरल्यामुळे धरणांमधील पाणीसाठा वाढला आहे.

जलसंपदा विभागाचे सहायक अभियंता सिडनी फर्नांडीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (20 जुलै) सकाळी 8.12 पासून धरण ओसंडून वाहू लागले. त्यामुळे पाणी टंचाईचा जो प्रश्न होता तो आता मिटला आहे. गेल्यावर्षी 8 जुलैला धरण ओव्हरफ्लो झाले होते.

गेल्यावर्षी 1,599 मिमी पाऊस झाल्यावर धरण भरून वाहू लागले होते. मात्र यंदा पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे धरणातील पाणीसाठी कमी झाला होता. त्यामुळे यावर्षी 2170 मिमी पाऊस झाल्यावर साळावळी धरण ओव्हरफ्लो झाले आहे.

इथे पहा व्हिडिओ....

ते पुढे म्हणाले की, साळावळी धरण पर्यटकांसाठी खुले असून ऑगस्टमध्ये 'आझादी का अमृतमहोत्सव' अंतर्गत इथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पर्यटक गोव्यात उत्साहाने येतात. पण त्यासोबतच आपली काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे सुरक्षारक्षक, जलसंपदा विभाग आणि सरकारतर्फे करण्यात आलेल्या सुचनांचे पर्यटकांनी पालन करणे अनिवार्य आहे.

दरम्यान, इथे येणाऱ्या पर्यटकांनी सोबत ओळखपत्र आणणे गरजेचे आहे. तसेच धरण परिसरात कोणत्याही प्रकारची अस्वच्छता न करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांतर्फे करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: सराईत गुंड 'टारझन' विरोधात हत्यार कायद्याखाली गुन्हा; अड्डयावर सापडली तलवार

DSSY चे 13 हजार बोगस लाभार्थी! समाजकल्याण खात्यातर्फे पडताळणी; 50 कोटी रुपयांची वसूली

Gas Cylinder Seizure: 1021 पैकी 485 सिलिंडर रिकामे, वजनमाप खात्‍याकडून मोजणी; अहवाल मिळाल्‍यानंतर पोलिस करणार कारवाई

SCROLL FOR NEXT