Falling of trees due to rains in goa  Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023 : सत्तरीत पडझडीमुळे लाखोंचे नुकसान; अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित

कोपार्डेत नळ कोरडे

दैनिक गोमन्तक

Sattari Goa : सत्तरी तालुक्यात शुक्रवारी (ता.७) दिवसभर मुसळधार पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाऊस व वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी संध्याकाळी उशिरापर्यंत झाडांची पडझड सुरूच होती.

यावेळी लाखोंचे नुकसान झाल्याची माहिती आहे. त्यात अनेक ठिकाणी वीजखांब व वीजतारांवर झाडे पडून मोठे नुकसान झाले. यामुळे अनेक ठिकाणी वीज खंडित झाली होती.

दरम्यान, संध्याकाळी उशिरापर्यंत झाडांची पडझड सुरूच होती. त्यामुळे नेमके किती नुकसान झाले याची माहिती मिळू शकली नाही. तरीदेखील लाखोंच्या वर नुकसान झालेले आहे. यावेळी सर्व घटनास्थळी वाळपई अग्निशमन दलाचे अधिकारी संतोष गावस यांच्या मार्गदर्शनाखाली देसाई, विराज गावस, सतीश गावस व इतर जवानांनी तातडीने मदतकार्य केले.

कोपार्डेत नळ कोरडे

गेल्या काही दिवसापासुन कोपार्डे गावातील काही भागात नळ कोरडे आहेत. वारंवार पाणी पुरवठा खात्याला कळवून सुध्दा अजुन पाणी सोडलेले नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थ संतप्त झाले आहे. काहीना नळा शिवाय दुसरा पर्याय नाही आहे. त्यामुळे भर पावसात पाण्याविना हाल काढावे लागत आहे.

बाकीच्या वेळी विज खंडीत असल्याने निमित्त पुढे काढत असतात मात्र आता विज सुरळीत असुन सुध्दा पाणी पुरवठा का केल्या जात नाही याबद्दल नागरिकांनी शंका व्यक्त केली आहे. काहींना पावसाळ्याचे पाणी पिण्याची वेळ आलेली आहे.

शुक्रवारी झालेली पडझड...

  1. ब्रह्माकरमळी येथे ब्रह्मदेव मंदिराजवळील वडाचे झाड पडून नुकसान.

  2. घोटेली क्र. १ केरी-सत्तरी येथील लोकमान्य बँकेजवळ विद्युत वाहिन्यांवर आंब्याचे झाड कोसळले.

  3. झर्मे मार्गावर काजूचे झाड वीजवाहिन्यांवर कोसळले.

  4. वाळपई-सत्तरी येथील आयआरबी कॅम्पजवळ गुलमोहरचे झाड वीजवाहिन्यांवर कोसळले.

  5. चरावणे-सत्तरीत अकेशियाचे झाड पडून घराचे नुकसान झाले.

  6. मोर्ले-सत्तरी येथील शंकरनाथ मठाजवळील मलिकवाडा येथे घरावर झाड कोसळले.

  7. मोर्ले-सत्तरी येथील कम्युनिटी हॉलजवळतील मुख्य महामार्गावर काजूचे झाड रस्त्यावर कोसळले.

  8. वाळपई येथील रुग्णालयासमोरील रस्ता व कंपाउंडवर झाड कोसळले.

  9. धामशे-सत्तरी येथे काजूचे झाड वीजवाहिन्यांवर पडून वीजखांब मोडला.

  10. नवोदय विद्यालयाजवळ ११ केव्ही वीजवाहिन्यांवर काजूचे झाड पडून नुकसान झाले.

  11. इतर भागातही पडझड झाल्याने मोठे नुकसान झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs ENG 1st Test: ॲशेसमध्ये 100 वर्षांतील सर्वात मोठा रेकॉर्ड! स्टार्क-स्टोक्सच्या माऱ्यापुढे फलंदाज ढेपाळले; पहिल्याच दिवशी 19 विकेट्स VIDEO

Bodybuilder Roya Karimi: 14व्या वर्षी लग्न, 15व्या वर्षी आई... 'तालिबानी' बंधनं झुगारुन 'रोया करीमी' बनली टॉपची बॉडीबिल्डर; आज जगभर होतेय चर्चा

AUS vs ENG: पहिल्याच सामन्यात गरमागरमी, लाबुशेन-कार्स मैदानावर भिडले; बाचाबाचीचा व्हिडिओ तूफान व्हायरल

Earthquake in BAN vs IRE 2nd Test: बॉलिंग-बॅटिंग सोडून 'पळापळ'! भूकंपानं मैदान हादरलं, खेळाडूंंमध्ये भीतीचं वातावरण

Pakistan Factory Blast: पाकिस्तानात फॅक्टरीत भीषण स्फोट, 15 ठार, 7 जखमी; फॅक्टरीचा मालक फरार, मॅनेजरला अटक VIDEO

SCROLL FOR NEXT