Goa Monsoon 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023 : साखळी भागाला पावसाने झोडपले; सखल भागात पूरसदृश स्थिती

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Monsoon 2023: मुसळधार पावसाने मंगळवार,१८ रोजी दिवसभर साखळी व परिसराला अक्षरशः झोडपून काढले. संध्याकाळी तर ४ वा. नंतर अविश्रांत पडलेल्या पावसामुळे साखळीतील जनजीवन विस्कळीत झाले. सोसाट्याचा वाराही वाहत होता.

त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण होते. संततधारेमुळे साखळीतील वाळवंटी नदीच्या पातळीत किंचित वाढ झाली आहे. परंतु पूरस्थिती नियंत्रणात आहे. जलस्रोतचे अभियंते व सर्व यंत्रणेला सतर्क करण्यात आले आहे.

वेधशाळेने राज्यात जोरदार पावसाचा वर्तवलेला अंदाज खरा ठरला. साखळीत वाळवंटी नदी तुडूंब भरून वाहत असून सर्व सखल भागांमध्ये पूरसदृष्य स्थिती उद्‍भवली आहे.

साखळी मतदारसंघातील सर्वच भागांमध्ये मंगळवारी सकाळीपासूनच पाऊस सुरू होता. मध्ये मध्ये उसंत घेत पडणाऱ्या पावसाने संध्याकाळी रौद्ररूप धारण केले, ४ वाजल्यानंतर जोरदार वृष्टी झाली.

साखळी बाजारातील नाला व नदीची पाणी पातळी संध्याकाळी अडीच मीटरच्या आसपास होती. तर रात्री पडलेल्या पावसामुळे ती किंचित वाढली होती. साखळीत एकूण ६१ इंच पाऊस नोंद झाला असून मंगळवारी २.११ इंच पाऊस पडला.

गटार व्यवस्थेचा बोजवारा

वाळवंटी बरोबरच साखळी मतदारसंघातील इतर सर्व नदी नाले तुडूंब भरून वाहत आहेत. काही ठिकाणी तर गटरव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. जोरदार पाऊस आल्यानंतर पावसाचे पाणी रस्त्यांवरून वाहत आहे.

साखळी भाजप कार्यालयासमोरच जोरदार पावसानंतर गटरातील पाणी रस्त्यावरून वाहत होते. भरधाव वेगात ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे पाणी पादचाऱ्यांवर उडत होते. तसेच या पाण्याबरोबर माती व दगडही वाहून आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT