Terekhol River 
गोवा

Goa Monsoon: सतर्क राहा! गडनदी आणि तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडली

गोवा, कोकणात रेड अलर्ट! अतिवृष्टीचा इशारा

Pramod Yadav

Goa Monsoon 2023: भारतीय हवामान खात्याने गोवा आणि कोकणात आज रेड अलर्ट जारी केला असून, अतिवृष्टीचा पावसाचा इशारा दिला आहे. या काळात मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून, 204.4 mm पाऊस होण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, गुरूवारी राज्यात आणि कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे पेडण्यातील गडनदी आणि तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडली असून, नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

पेडण्यातील नागरिकांना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडून एक संदेश पाठवण्यात आला आहे.

"अतिवृष्टीमुळे गडनदी आणि तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडली असून, सखल भागात पूरस्थिती निर्माण होऊ शकते. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा. सुरक्षित आणि सतर्क राहा. 02362-228847." असा संदेश नागरिकांना पाठवण्यात आला आहे.

आज रेड आणि येत्या दोन दिवसांसाठी ऑरेन्ज अलर्ट

भारतीय हवामान खात्याने गोवा आणि कोकणात आज रेड अलर्ट जारी केला असून, अतिवृष्टीचा पावसाचा इशारा दिला आहे. तर, 22 ते 24 जुलै रोजी ऑरेन्ज अलर्ट जारी करण्यात आला असून या काळात 115.6 ते 204.4 मिमि पाऊस पडण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

यामुळे स्थानिक ठिकाणी पाणी साचणे यासारख्या घटना घडू शकतात. पाणी अधिक साचणाऱ्या धोकादायक ठिकाणी नागरिकांना न जाण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT