Surla Waterfall Dainik Gomantak
गोवा

Waterfalls In Goa: टेन्शन नको काळजी घ्या! गोव्यातील 14 धबधबे सर्वांसाठी खुले, ही घ्या यादी

गोवा सरकारने पर्यटकांसाठी वन क्षेत्रात येणारे 14 धबधबे खुले केले आहेत.

Pramod Yadav

Waterfalls In Goa Open For All: मैनापी धबधब्यावरील दोघांच्या मृत्यूनंतर पर्यटकांना राज्यातील वन क्षेत्रात असणाऱ्या धबधब्यांवर जाण्यास सरकारने बंदी घातली आहे. नुकतेच रविवारी हजारोंच्या संख्येने पर्यटक धबधब्यांवर जाण्यासाठी रेल्वेमार्गे आले होते.

या पर्यटकांना उठाबशा काढण्याची शिक्षा रेल्वे पोलिसांनी दिली. दरम्यान, गोवा सरकारने पर्यटकांसाठी वन क्षेत्रात येणारे 14 धबधबे खुले केले आहेत. त्यामुळे पर्यटकांना वर्षापर्यटनाचा आनंद घेता येणार आहे.

14 धबधबे खुले करण्यात आले आहेत

पाली, हिवरे, चरावणे, चिदमबरम, नानेली, ऊकेची खाडी, कुमठळ, भाटी, कुस्के, पाली, मयडा, गुळेली, गुंगूलडे, मदियाणी आणि खाडी

नियम आणि अटी

- धबधब्यांवर प्रवेशासाठी निर्धारीत रक्कमेचे तिकीट काढावे लागेल.

- धबधब्यांवर येणाऱ्यांना वन खात्याने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे लागेल.

- तसेच, वन क्षेत्रात कोणत्याही प्रकारची नासधुस अथवा नुकसान करण्यास मनाई.

दूधसागरला जाण्यासाठी रेल्वेतून उतरताय? रेल्वेकडून सक्त कारवाईची सूचना

"दूधसागर किंवा ब्रागांझा घाटावरील इतर कोणत्याही स्टेशनवर डी-बोर्डिंग करण्यास मनाई आहे. सर्व प्रवाशांनी सहकार्य करावे आणि आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी नियमांचे पालन करावे." अशी सूचना विभागीय रेल्वेने केली आहे.

रेल्वे कायद्याच्या कलम 147,159 नुसार रेल्वे ट्रॅकवर किंवा त्या बाजूने चालणे हा गुन्हा आहे. यामुळे तुमच्याच नव्हे तर ट्रेनच्या ऑपरेशनलाही धोका निर्माण होतो. असे दक्षिण रेल्वेने खात्याने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT