Dudhsagar Waterfalls: दूधसागरला जाण्यासाठी रेल्वेतून उतरताय? रेल्वेकडून सक्त कारवाईची सूचना

मैनापी धबधब्यावरील दोघांच्या मृत्यूनंतर पर्यटकांना राज्यातील वन क्षेत्रात असणाऱ्या धबधब्यांवर जाण्यास सरकारने बंदी घातली आहे.
Dudhsagar Falls
Dudhsagar FallsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Dudhsagar Waterfalls: भगवान महावीर राष्ट्रीय उद्यानातील जगप्रसिद्ध दूधसागर धबधबा पावसाळ्यात सर्वांसाठी आकर्षण असते.

पण, मैनापी धबधब्यावरील दोघांच्या मृत्यूनंतर पर्यटकांना राज्यातील वन क्षेत्रात असणाऱ्या धबधब्यांवर जाण्यास सरकारने बंदी घातली आहे.

नुकतेच रविवारी हजारोंच्या संख्येने पर्यटक धबधब्यांवर जाण्यासाठी रेल्वेमार्गे आले होते.

मात्र, बंदी असल्याने रेल्वे पोलिसांनी पर्यटकांना रोखले आणि त्याच्यावर कारवाई करत त्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा केली. भारतीय रेल्वेने धोकादायक पद्धतीने रेल्वेतून उतरून दूधसागरला जाणाऱ्या पर्यटकांसाठी कडक कारवाईचा इशारा देत महत्वाची सूचना केली आहे.

ब्रागांझा घाटाच्या बाजूला असलेल्या दूधसागर धबधब्यावर जाण्यासाठी मोठ्या संख्येने लोक डी-बोर्डिंग करून किंवा ट्रॅकच्या बाजूने चालत जात आहेत.

कॅसल रॉक स्टेशनजवळ असलेले दूधसागर रेल्वे स्थानक दक्षिण पश्चिम रेल्वेच्या (SWR) अधिकारक्षेत्रांतर्गत कर्नाटकातील उत्तरा कन्नड जिल्ह्यात येते.

"दूधसागर किंवा ब्रागांझा घाटावरील इतर कोणत्याही स्टेशनवर डी-बोर्डिंग करण्यास मनाई आहे. सर्व प्रवाशांनी सहकार्य करावे आणि आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी नियमांचे पालन करावे." अशी सूचना विभागीय रेल्वेने केली आहे.

Dudhsagar Falls
Dudhsagar Waterfall Goa: बंदी असूनही पर्यटकांचे ‘दूधसागर’वर धूमशान

रेल्वे कायद्याच्या कलम 147,159 नुसार रेल्वे ट्रॅकवर किंवा त्या बाजूने चालणे हा गुन्हा आहे. यामुळे तुमच्याच नव्हे तर ट्रेनच्या ऑपरेशनलाही धोका निर्माण होतो. असे दक्षिण रेल्वेने खात्याने म्हटले आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दूधसागर धबधबा पाहण्यासाठी येणारे पर्यटक तिकीट न काढताच कुळे येथे रेल्वेत चढतात. मडगावाहून रेल्वे आली रे आली की, या पर्यटकांची एकच झुंबड उडते.

रेल्वेच्या मिळेल त्या दारातून ते रेल्वेत प्रवेश करतात आणि प्रवाशांच्या सीटवर बसतात. त्यामुळे इतर प्रवाशांची कुचंबणा होते. यापुढेही आमची धडक कारवाई चालूच राहील, असे एका रेल्वे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com