Money Laundering Case Dainik Gomantak
गोवा

Money Laundering Case: रोहन हरमलकरसह चौघांवर 'मनी लाँड्रिंग'चे आरोप निश्चित; 25 ऑगस्टला पुढील सुनावणी

Rohan Harmalkar Money Laundering Case: रोहन हरमलकर आणि मोहम्मद सुहैल यांना कोलवाळ कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर सादर करण्यात आले होते.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रिंग ॲक्ट (पीएमएल), २००२ अंतर्गत नोंदवण्यात आलेल्या एका मनी लाँड्रिंग प्रकरणात उत्तर गोवा जिल्हा आणि सत्र न्यायालयाने मुख्य संशयित रोहन हरमलकर, इस्तेवान डिसोझा, मोहम्मद सुहैल आणि समीर सतारडेकर यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ (मनी लाँड्रिंगचा गुन्हा) आणि कलम ४ अंतर्गत आरोप निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणातील पुढील सुनावणी २४ ऑगस्ट रोजी निश्चित करण्यात आली असून, त्या दिवशी सर्व आरोपींवर औपचारिकपणे आरोप निश्चित केले जातील.

रोहन हरमलकर आणि मोहम्मद सुहैल यांना कोलवाळ कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर सादर करण्यात आले होते. आरोपी अल्कँत्रो डिसोझा याचे निधन झाल्याचे न्यायालयात सांगण्यात आले. तर इस्तेवान डिसोझा आणि समीर सतारडेकर अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या वकिलांनी वैयक्तिक हजेरीतून सूट मिळण्यासाठी अर्ज केला होता; न्यायालयाने तो मान्य केला.

दरम्यान, हणजूण, हडफडे आणि आसगाव येथील जमीन घोटाळ्याशी संदर्भात आरोपींवर गुन्हा नोंदविण्यात आला होता. मूळ मालकांच्या नकळत बोगस कागदपत्रे, बनावट मालकी हक्क, सरकारी महसूल नोंदींमध्ये फेरफार आणि बनावट व्यक्ती उभ्या करून कोट्यवधींच्या जमिनी हडपल्याचा आरोप आरोपींवर आहे.

एप्रिल २०२५ मध्ये ईडीने या प्रकरणी गोव्यात अनेक ठिकाणी छापे टाकले होते. या कारवाईत १,००० कोटी रुपयांहून अधिक मूल्याची बनावट जमिनीची कागदपत्रे आणि ६०० कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या मालमत्तांची मूळ कागदपत्रे जप्त करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT