Arrest  Dainik Gomantak
गोवा

Goa Molestation Case: बार्देशमध्ये महिलेचा विनयभंग करणारा गजाआड; न्यायालयाने सुनावली 3 दिवसांची पोलीस कोठडी

Goa Molestation Case: आरोपीने तक्रारदाराच्या आईसमोर लज्जास्पद आणि किळसवाणे कृत्य केले.

Ganeshprasad Gogate

Goa Molestation Case: गोव्यात महिलांविषयक गुन्ह्यांचे प्रकार वाढत असून नुकताच बार्देशमधून एका धक्कादायक प्रकार समोर आलाय. बार्देश येथे रस्त्यांवरून जाणाऱ्या एका महिलेचा विनयभंग करत तसेच तिच्या घरी जाऊन तिच्या आणि तिच्या आईसमोर लज्जास्पद कृत्य करण्याचा प्रकार एका इसमाने केल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी प्रवीण पार्सेकर (वय 22 वर्ष, रा. कॅन्सा थिवी) याला कोलवाळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेसंबंधी सदर महिलेने आज 19 जानेवारी रोजी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत म्हटल्यानुसार संशयित आरोपी प्रवीण पार्सेकर हा मागील 10 -15 दिवसांपासून संबंधीत महिलेचा अ‍ॅक्टिव्हा स्कूटरने पाठलाग करत असे.

तसेच आज त्याने सदर महिलेचा भर रस्त्यात विनयभंग करीत तिच्यावर जोरजबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

याआधी 03 जानेवरी दरम्यानआरोपीने तक्रारदाराच्या घराच्या व्हरांड्यात बळजबरीने प्रवेश करत तिच्या आईसमोर लज्जास्पद आणि किळसवाणे कृत्य केले. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तक्रारदाराच्या आईचा देखील आरोपीने विनयभंग करत तिला ठार मारण्याची धमकी दिली.

या घटनेची तक्रार सदर महिलेने पोलीस स्थानकात दिल्यावर पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला थिवी येथून अटक केलीय.

तसेच त्याच्यावर कोलवाळ पोलीस ठाण्यात IPC U/s 04/2024 U/s 354-A, 354-D, 448, 509, 504, 506(ii) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आरोपी प्रवीण पार्सेकरला आज न्यायालयात हजर केले असता त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT