Mission Rabies Signs MoU with BMC Dainik Gomantak
गोवा

100 टक्के रेबीजमुक्तीसाठी मुंबईत आता 'गोवा मॉडेल', 'मिशन रेबीज'चा BMC सोबत करार

पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये 10 दिवसांत 75,000 भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्याचे धेय्य

Pramod Yadav

Mission Rabies Signs MoU with BMC: मुंबई शंभर टक्के रेबीजमुक्त होण्यासाठी आता यशस्वी गोवा मॉडेलचा स्वीकार करणार आहे. याबाबत 'मिशन रेबीज'ने बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) सोबत एक सामंजस्य करार केला आहे. कराराच्या माध्यमातून मुंबईत 100 टक्के रेबीज-मुक्त गोवा मॉडेल राबविण्यासाठी कौशल्य आणि तांत्रिक सहाय्य प्रदान केले जाणार आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, मुंबईत पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये 10 दिवसांत 75,000 भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

यासाठी, 50 स्वयंसेवकांची एक टीम भटक्या श्वानांचा शोध घेणे आणि पकडून लसीकरण करण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर फिरणार आहे.

गोवा मिशन रेबीजचे शिक्षण संचालक डॉ. मुरुगन अप्पुपिल्लई लसीकरण मोहिमेच्या सूक्ष्म तयारीवर प्रकाश टाकला.

भटक्या कुत्र्यांची संख्या नोंद करण्यासाठी आमच्याकडे एक अॅप आहे आणि आमचे अधिकारी गेल्या तीन महिन्यांपासून मुंबईत तैनात आहेत अशी त्यांनी इंग्रजी वृत्तापत्राला माहिती दिली.

मिशन रेबीज आणि बीएमसी यांच्यातील सहकार्य मिशन रेबीज आणि गोवा सरकारच्या समान धर्तीवर चालणार आहे.

'गोवा देशातील पहिले 'रेबीज नियंत्रित राज्य' आहे. राज्यात मानवात रेबीज संक्रमण रोखण्यात आले आहे. 2018 पासून गोव्यात एकही रेबीज संक्रमित व्यक्ती आढळून आलेला नाही.

दरम्यान, गोवा मॉडेल आता मुंबईत राबवले जाणार आहे. या अंतर्गत भटक्या श्वानांचे लसीकरण हे प्राथमिक धेय्य असेल, त्यानंतर यात पाळीव श्वानांचा देखील समावेश केला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT