Goa MLAs raise anti Kovid awareness in Sukkur Marra Pilarna 
गोवा

गोवा: पर्वरीतील सुकूर, मार्रा पिळर्णमध्‍ये आमदारांनी केली कोविड विरोधी जनजागृती

गोमंतक वृत्तसेवा

पर्वरी : सुकुर पंचायत आणि मार्रा पिळर्ण पंचायत क्षेत्रात कोविडबाधित रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढता आहे. दोन्ही पंचायतींनी आपल्‍या क्षेत्रातील सर्व दैनंदिन व्यवहारावर निर्बंध घातले आहेत. लोकांनी दैनंदिन जीवनावश्यक वस्तू सकाळी 6 ते दुपारी 1 या वेळेतच खरेदी करावेत. दुपारनंतर सर्व दुकाने, आस्थापने बंद ठेवण्याची विनंती पत्रकाद्वारे केली आहे. गावात ध्‍वनीक्षेपकाद्वारे जागृती करण्यासाठी आली आहे. तसेच सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच संदीप बांदोडकर यांनी केले आहे. (Goa MLAs raise anti Covid awareness in Sukkur Marra Pilarna)

पर्वरी आमदार रोहन खंवटे (Rohan Khavnte) यांच्यासह पेन्ह दि फ्रान्‍सचे सरपंच स्वप्नील चोडणकर आणि साल्वादोर दि मुंद सरपंच संदीप साळगावकर तसेच पंच सदस्‍य यांनी सर्व परिसरात फिरून लोकांना आवाहन केले. कोणीही विनाकारण रस्त्यावर फिरू नये. सध्‍या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. दर दिवशी पर्वरी प्राथमिक आरोग्य केंद्रात शंभराहून अधिक कोरोनाची लागण होत आहे. त्यांच्यासाठी आरोग्य केंद्रात आवश्यक प्राणवायू, होम आयसोलेशन किट, औषधांचा तुटवडा आहे. सरकारने अजूनही गांभीर्याने योग्य पावले उचलली नाहीत. जर आपल्याला आपला जीव महत्त्‍वाचा वाटत असेल, तर प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून घरातच राहावे, असे आवाहन आमदार खंवटे यांनी केले आहे.

पर्वरी मतदारसंघातील सुकुर पंचायतीने आपल्या भागातील दैनंदिन व्यवहारावर निर्बंध घातले आहेत, ही चांगली बाब आहे. कोरोना विषाणू  जात, धर्म, पक्ष हे काहीच पाहत नाही. त्यासाठी प्रत्येकाने आपसातील मतभेद बाजूला सावरून या महामारीशी एकजुटीने लढले पाहिजे. कारण गेल्या काही दिवसात पर्वरी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात तरुण तसेच ज्‍येष्ठ नागरीक मरण पावत आहेत. ज्या लोकांना कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर त्यांनी आमच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे खंवटे यांनी सांगितले.
सुकूर, मार्रा पिळर्णमध्‍ये कोविड विरोधी जनजागृती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT