Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Court: पाच कोटी खंडणी मागणाऱ्याला पोलिसांना 1 लाख रुपये द्यावे लागणार; आमदार अश्‍लील व्हिडिओ मॉर्फ प्रकरण

MLA Morph Video Extortion Case: संशयित कुकेश रावता याने राज्यातील एका आमदाराचा अश्‍लील मॉर्फ व्हिडिओ बनवून खंडणीची मागणी केली होती.

Sameer Panditrao

पणजी: राज्यातील आमदाराचा अश्‍लील व्हिडिओ मॉर्फप्रकरणातील संशयित कुकेश रावता याच्याविरुद्ध दाखल केलेला गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने रद्द केला आहे. न्यायालयाने कुकेशला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला असून, ही रक्कम त्याला पुढील १५ दिवसांच्या आत गोवा पोलिस कल्याण निधीत जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

संशयित कुकेश रावता याने राज्यातील एका आमदाराचा अश्‍लील मॉर्फ व्हिडिओ बनवून खंडणीची मागणी केली होती. आमदाराने सुरवातीला ५५ हजार रुपये पाठविलेल्या बँक खात्यात जमा केले होते.

त्यानंतर काही दिवसांनी या व्यक्तीने ५ कोटींची मागणी केली. त्यामुळे या आमदाराने तक्रार दिल्यावर संशयितावर गुन्हा दाखल झाला होता आणि सायबर पोलिसांनी संशयिताला अटक केली होती.

तपासादरम्यान तक्रारदार आणि आरोपी यांच्यात समझोता झाला. त्यामुळे आरोपीने गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात फौजदारी वटहुकूम याचिका दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या क्राईम ब्रँचने त्याला उत्तराद्वारे विरोध केला होता.

हे प्रकरण गंभीर आहे असे तोंडी निरीक्षण खंडपीठाने करत यावरील सुनावणी दिनांक ४ मार्च रोजी ठेवली होती. सदर सुनावणीवेळी खंडपीठाने ही तक्रार रद्दबातल ठरवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT