Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: गोव्यातील आमदाराचा अश्‍लील मॉर्फ व्हिडिओ प्रकरण; 'गुन्हा रद्द' करण्यासाठी संशयिताची खंडपीठात धाव

MLA Morph Video Extortion Case: संशयित कुकेश रावता याने राज्यातील एका आमदाराचा अश्‍लील मॉर्फ व्हिडिओ बनवून खंडणीची मागणी केली होती.

Sameer Panditrao

पणजी: एका विद्यमान आमदाराचा अश्‍लील मॉर्फ व्हिडिओ तयार करून खंडणी वसुली केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या संशयित कुकेश रावता याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली आहे.

या प्रकरणाचा तपास करत असलेल्या क्राईम ब्रँचने त्याला उत्तराद्वारे विरोध केला आहे. हे प्रकरण गंभीर आहे असे तोंडी निरीक्षण खंडपीठाने करत यावरील सुनावणी पुढील मंगळवारी (४ मार्च) ठेवली आहे.

संशयित कुकेश रावता याने राज्यातील एका आमदाराचा अश्‍लील मॉर्फ व्हिडिओ बनवून खंडणीची मागणी केली होती. संशयितावर गुन्हा दाखल केला होता. तपास यंत्रणेला संशयिताने समझोता केल्याने हा गुन्हा रद्द चे निर्देश द्यावेत, अशी विनंती याचिकादार रावता याने याचिकेत केली आहे. पोलिसांची बाजू मांडणारे वकील उपस्थित नसल्याने खंडपीठाने सुनावणी तहकूब केली.

...तर चुकीचा संदेश

संशयित याचिकादार कुकेश रावता याच्या या याचिकेला क्राईम ब्रँच पोलिसांनी तपासकामाची माहिती देत त्याला विरोध करणारे उत्तर दिले आहे. रावता याने केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. तक्रारदार व संशयित याने कोणतीही माहिती न देता प्रकरण आपपासात मिटवले असले तरी त्याची माहिती तपास यंत्रणेला दिलेली नाही.

अशाप्रकारे ही प्रकरणे आपापसात मिटवण्यास संधी दिल्यास समाजामध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो,अशी बाजू पोलिसांच्या वकिलांनी मांडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT