Vishwajit Rane And Devendra Fadnavis Dainik Gomantak
गोवा

Vishwajit Rane Meet Fadanvis: मंत्री विश्वजीत राणेंनी मुंबईत घेतली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

Goa Minister Vishwajit Rane Meet Devendra Fadanvis: देशातील नागरिकांच्या प्रगती आणि उत्तम आरोग्यासाठी गणरायाच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.

Pramod Yadav

मुंबई: गोव्याचे आरोग्य, वन आणि नगरनियोजन खात्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने राणे यांनी फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट देऊन बाप्पाचे दर्शन घेतले. राणे यांनी या भेटीची फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

“गणेश चतुर्थीच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. देशातील नागरिकांच्या प्रगती आणि उत्तम आरोग्यासाठी गणरायाच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. फडणवीस यांचे नेहमीच बहुमोल मार्गदर्शन मिळाले आहे. दोन्ही राज्यांच्या प्रगतीसाठी आम्ही एकत्र काम करु,” असे मंत्री राणे यांनी एक्सवरुन शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Vishwajit Rane Meet Devendra Fadnavis

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सरकारी वर्षा या निवासस्थानी गणरायाची स्थापना करण्यात आली आहे. विधिवत पूजेने मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब बाप्पाची स्थापना केली आहे. वर्षा निवासस्थानी राज्यातील विविध नेते, मंत्र्यांनी बाप्पाचे दर्शन घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Population: गोव्याची लोकसंख्या होणार 17 लाख! सरकारी यंत्रणेचा अंदाज; जनगणनेची पूर्वतयारी सुरू

Goa: ‘फलोत्पादना’मुळे भाजी उत्‍पादकांना पावले गणराय! 5 दिवसांत कमावले 23 लाख; महामंडळाकडून 1.22 कोटींची उलाढाल

Goa Railway Project: 'गोवा कोल हब बनणार नाही...'; रेल्वे दुहेरीकरणावरुन मुख्यमंत्री सावंत यांची ग्वाही, पण वाद कायम

High Court: गोवा सरकारला मोठा झटका; वैद्यकीय, दंत महाविद्यालयातील Sports Quota रद्द

Sara Tendulkar Goa Vacation: सारा तेंडुलकरचे गोवा व्हेकेशनचे फोटो व्हायरल! मिस्ट्री मॅनसोबतच्या जवळीकतेने सोशल मीडियावर चर्चांना उधाण, कोण आहे तो?

SCROLL FOR NEXT