Subhash shirodkar Dainik Gomantak
गोवा

All India OBC Federation: ओबीसी अधिवेशनाचे उद्‍घाटन मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते; गोव्याला प्रथमच मान

Subhash Shirodkar: गोव्यातील एका मंत्र्याला अखिल भारतीय पातळीवर प्रथमच असा मान मिळाला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: अमृतसर पंजाब येथे ७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या अ.भा. ओबीसी महासंघाच्या सातव्या महाअधिवेशनाचे उद्‍घाटन गोव्याचे जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते होणार आहे. गोव्यातील एका मंत्र्याला अखिल भारतीय पातळीवर प्रथमच असा मान मिळाला आहे.

गोव्यातील ओबीसी चळवळीला सुभाष शिरोडकर सक्रिय सहकार्य करत असून गोव्यात ओबीसीत समावेश असलेल्या १९ समाजातील गरजू लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांचा लाभ मिळावा म्हणून प्रयत्न करत आहेत.

मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय ओबीसी महासंघाने शिरोडकर यांना निमंत्रित केले असावे, असा अंदाज आहे. गोव्यातील ओबीसी समाजांच्या विकासाला चालना मिळावी म्हणून स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करण्यात यावे, अशी मागणी ओबीसी महासंघाने लावून धरली आहे.

आगामी जनगणणेत ओबीसींची स्वतंत्र जनगणना करावी, अशी मागणी पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय महाअधिवेशनात केली जाण्याची शक्यता आहे.

ओबीसी महासंघाच्या गोवा शाखेचे अध्यक्ष मधू नाईक सरचिटणीस सर्वेश बांदोडकर तसेच डझनभर प्रतिनिधी पंजाबात होणाऱ्या या महाअधिवेशनाला उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री गोविंद गावडेंच्या कार्यालयातील माजी कर्मचाऱ्याला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Syed Mushtaq Ali Trophy: सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत 'दीपराज' करणार गोव्याचं नेतृत्व; सुयश उपकर्णधार!

Today's Live Updates Goa: ...तर मी चाललो मांद्रेत ! मायकल लोबोंचे वेगळ्या राजकारणाचे स्पष्ट संकेत

CM Pramod Sawant: गोमंतकीयांनो सावधान, भुलथापांना बळी पडू नको; वाढत्या फसवणूकीच्या घटनांवर मुख्यमंत्र्यांचे आवाहन

St. Xavier Exposition: शव प्रदर्शनाला 8 दशलक्ष लोकं हजेरी लावण्याची शक्यता; गोव्यात होणार 45 दिवसांचा भावदीव्य सोहळा

SCROLL FOR NEXT