Ravi Naik  Dainik Gomantak
गोवा

गोव्याचं पाणी आखाती देशात नेणार, आमदार रवी नाईक पुन्हा चर्चेत

नेटकऱ्यांकडून रवी नाईक यांच्या वक्तव्याचा समाचार, सोशल मीडियावर नाईक ट्रोल

दैनिक गोमन्तक

पणजी : फोंड्याचे भाजप आमदार रवी नाईक नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी एक अजबगजब विधान केलं आहे ज्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. गोव्याचं पाणी साठवून ते अगदी आखाती देशातही नेणं शक्य असल्याचं तर्कट बांधल्याने रवी नाईक नुसते गोव्यातच नाहीत तर आता सोशल मीडियावरची चांगलेच चर्चेत आले आहेत.

गोव्यात (Goa) ठिकठिकाणी धरणं बांधून देशात ज्याठिकाणी पाणीटंचाई आहे, अशा ठिकाणी पाणी पुरवणं शक्य असल्याचं वक्तव्य रवी नाईक यांनी केलं आहे. इतकंच नाही, तर गोव्यात साठवलेलं हेच पाणी थेट आखाती देशांमध्ये नेणं शक्य असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. रवी नाईक (Ravi Naik) यांनी नुकताच गोव्याच्या कृषीमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. यानंतर त्यांनी पहिलंच केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

गोव्यात सध्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आधी खाणपट्ट्यात असलेलं पाण्याचं दुर्भिक्ष आता गावागावातच नाही तर राजधानी पणजीतही जाणवू लागलं आहे. काही ठिकाणी तर केवळ 2-4 तासच पाण्याचा पुरवठा केला जात आहे. तर काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवावं लागत आहे. अशातच नव्याने मंत्री झालेल्या आणि माजी मुख्यमंत्री असलेल्या रवी नाईक यांच्या कल्पनाशक्तीची चर्चा होऊ लागली आहे. अनेकांनी तर सोशल मीडियावर रवी नाईक यांना ट्रोलही केलं आहे. जे रवी नाईक यांना सुचतं ते मुख्यमंत्री किंवा जलस्त्रोत मंत्र्यांना का सुचत नाही, असंही नेटकऱ्यांनी विचारण्यास सुरुवात केली आहे.

रवी नाईक हे विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून (Congress) भाजपमध्ये दाखल झाले आहेत. मगोपच्या केतन भाटीकर यांच्या 77 मतांनी पराभव करत फोंड्याच्या आमदारपदी नाईक विराजमान झाले आहेत. रवी नाईक यांना प्रमोद सावंतांच्या कॅबिनेटमध्ये कृषी खात्यासह, हस्तकला आणि नागरी पुरवठा ही खाती सोपवण्यात आली आहेत.

दरम्यान रवी नाईक यांना त्यांची पुढची दिशा विचारली असता त्यांनी म्हटलं की, आधी मला अधिकाऱ्यांशी बैठक तर करु द्या? अजून खूप वेळ आहे. तुम्हाला माझे प्लान्स जाणून घ्यायची इतकी घाई का असा सवालही त्यांनी पत्रकारांना विचारला. यापूर्वीही भाजपच्या बैठकीवेळी बैठकीत नेमकं काय झालं असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावेळीही त्यांनी 'चाय पिया, समोसा खाया' असं उत्तर दिलं होतं. याचे मीम्सही सोशल मीडियावर आजही शेअर केले जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"आम्ही आणि पाकिस्तानी सैन्य एकच!" लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी सैफुल्लाह कसूरीची मोठी कबुली; भारताविरुद्ध पुन्हा ओकली गरळ

"...म्हणून गोवा बर्बाद" राज ठाकरेंनी मांडलं जमिनींच्या लुटीचं 'डिजिटल' गणित; महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत रील्सस्टार्सना लगावला टोला

Goa Tourism: गोव्याचा पर्यटनात जागतिक डंका! 2025 मध्ये 1 कोटी 8 लाख पर्यटकांनी दिली भेट

IND vs NZ: ऋषभ पंतच्या जागी 'या' युवा खेळाडूची संघात एन्ट्री, 'BCCI'ने केली घोषणा

Goa Politics: गोव्यात 'आप'ची नवी टीम जाहीर! वाल्मिकी नाईक प्रदेशाध्यक्ष, तर गर्सन गोम्स कार्यकारी अध्यक्ष

SCROLL FOR NEXT