Mauvin Godinho Meets Aviation Minister: गोव्याचे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी केंद्रीय नागरी उड्डयण राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांची भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये दाबोळी विमानतळ प्रश्नावर चर्चा झाली. यावेळी मोपा आणि दाबोळी ही दोन्ही विमानतळे एकमेकांच्या समन्वयाने कार्यरत राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय व्ही. के. सिंग यांनी दोन्ही विमानतळांमध्ये समन्वय ठेवला जाईल, अशी खात्री दिली. काही लोक विनाकारण दाबोळी विमानतळ बंद होणार असल्याची हवा करत आहेत, पण असे काही होणार नाही, दाबोळी विमानतळ सुरू राहील, त्यामुळे दक्षिण गोव्यातील लोकांनी काळजी करू नये, असेही मंत्री गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, यापुर्वी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही दाबोळी विमानतळ (Dabolim Airport) सुरूच राहणार असल्याच स्पष्ट केले होते. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी याबाबत चिंता व्यक्त करत दाबोळीला घोस्ट विमानतळ करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप केला होता. दाबोळी विमानतळाबाबत अफवा पसरवू नयेत, दोन्ही विमानतळ कार्यरत राहतील असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले होते.
फ्रान्सिस सार्दिन हे गोव्याचे मुख्यमंत्री असताना 1 मे 2000 रोजी केंद्राकडून त्यावेळचे राज्याचे मुख्य सचिव अशोक नाथ यांना एक पत्र आले होते. त्यात 29 मार्च 2000 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत एकदा मोपा विमानतळ सुरू झाला की, दाबोळी विमानतळ बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले होते. हे पत्र सोशल मीडियात व्हायरल झाले आहे.
हे पत्र उजेडात आल्यानंतर दाबोळी विमानतळ देशी विमानांसाठी, तर मोपा आंतरराष्ट्रीय विमानासाठी खुला असेल, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.