Goa Mining People's Front leader Puti Gaonkar  Dainik Gomantak
गोवा

खाणपट्ट्यात चर्चेचा विषय; पुती गावकर यांची सावंत च्या विरोधात भूमिका

खाणपट्ट्यात चर्चेचा विषय : पुती गावकरांना पाठिंबा कोण देणार, हा कळीचा मुद्दा

दैनिक गोमन्तक

मडगाव : मागची 10 वर्षे सत्तेवर असूनही भाजपला गोव्यात बंद पडलेल्या (Goa Mining) खाणी पुन्हा सुरू करण्यात अपयश आल्याने सांगे, सावर्डे, धारबांदोडा आणि डिचोली या खाणपट्ट्यातील लोक भाजपवर नाराज आहेत, ही गोष्ट जरी खरी असली तरी पुती गावकर यांची गोवा नवनिर्माण आघाडी पर्याय म्हणून लोक पसंत करणार का? गोवा मायनिंग फ्रंटचे अध्यक्ष पुती गावकर (Goa Mining People's Front leader Puti Gaonkar) यांनी गुरुवारी या आघाडीची घोषणा केल्यावर खाणपट्ट्यात हा विषय चर्चेत आला आहे.

येत्या निवडणुकीत पुती गावकर यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची घोषणा केली असून काँग्रेसनेही आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली. यावर पाळीचे माजी आमदार प्रताप गावस यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना असा पाठिंबा देण्यासाठी गावकर यांच्यामागे आहेत तरी कोण? असा उलट सवाल केला आहे.

गावस म्हणाले, खाणपट्ट्यात सगळेच लोक खाणीवर अवलंबून असलेले. त्यामुळे हा पट्टा भाजपवर प्रचंड नाराज आहे ही गोष्ट जरी खरी असली तरी ते पुती गावकर यांच्या संघटनेबरोबर ते जातील, अशी कुणी अपेक्षा धरू नये. गावकर यांना किती मते पडतील हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल, असे ते म्हणाले. गावस हे स्वतः पाळी मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात काँग्रेसच्या उमेदवारीवर लढू पाहात आहेत.

खाणपट्ट्यातील लोक जसे भाजपवर नाराज आहेत, तसेच खुद्द पुती गावकर यांच्याही विरोधात असल्याची माहिती काही स्थानिकांनी दिली. गोव्यात खाणी परत सुरू व्हाव्यात म्हणून मोठ्या विश्वासाने या आंदोलनाचे नेतृत्व गावकर यांच्या हाती दिले होते. पण यांच्याकडूनही काही झाले नाही, अशी भावना या पट्ट्यातील लोकांमध्ये आहे.

मायनिंग पीपल्स फ्रंटचे एक पदाधिकारी आणि सेसा गोवा खाण ट्रकचालक संघटनेचे अध्यक्ष वल्लभ दळवी यांनीही अशीच भावना व्यक्त केली. ते म्हणाले, गावकर यांनी जी सध्या संघटना उभी केली आहे ती खाण व्यवसायातील कुठल्याही घटकाला विश्वासात न घेता सुरू केली आहे. त्यामुळे या संघटनेला लोक पाठिंबा देतील असे मला वाटत नाही. त्यांनी जर नवी संघटना उभी केली असेल तर त्यांनी मायनिंग पीपल्स फ्रंट या संघटनेचा अजून का राजीनामा दिला नाही, असा सवाल त्यांनी केला.

धारबांदोडा येथील माजी सरपंच आणि मायनिंग पीपल्स फ्रंटचे उपाध्यक्ष बालाजी गावस यांनी मात्र खाणपट्ट्यात लोकांमध्ये भाजपच्या विरोधात जो प्रचंड संताप आहे त्याचा परिणाम निश्चितच या निवडणुकीवर होणार असून लोक भाजपला पाडण्यासाठी यावेळी मतदान करतील, असे मत व्यक्त केले. आहे त्या कंपन्यांच्या हातात ठेवा किंवा महामंडळ स्थापन करा; पण बंद पडलेल्या खाणी एकदाच्या सुरू करा, अशी खाण पट्ट्यातील लोकांची मागणी होती. पण भाजप सरकारने लोकांना झुलवत ठेवण्याव्यतिरिक्त दुसरे काहीच केले नाही. याचा परिणाम निवडणुकीत दिसून येणारच, असे त्यांनी सांगितले.

आधी फ्रंटमधून बाहेर पडा : दळवी

यापूर्वी गावकर यांनी मायनिंग पीपल्स फ्रंट भाजपच्या विरोधात निवडणूक लढविणार, अशी घोषणा केल्यावर त्यांना सर्वात प्रथम वल्लभ दळवी यांनीच विरोध केला होता. यासंदर्भात दळवी म्हणाले, हा फ्रंट कधीही राजकीय नव्हता. त्यात प्रत्येक पक्षातील लोक होते. फक्त खाणी सुरू व्हाव्यात या एकाच मागणीसाठी आम्ही सगळे एकत्र आलो होतो. या फ्रंटमध्ये भाजपचे लोकही आहेत. त्यामुळे पुती गावकर यांना राजकीय आघाडी बनवायची असेल तर त्यांनी फ्रंटमधून बाहेर पडून नंतरच ती स्थापन करावी, अशी मागणी केली होती. पण गावकर यांनी अजूनही फ्रंट सोडलेला नाही हे कसे? असा सवाल त्यांनी केला. या आंदोलनाचा नेता म्हणून लोकांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी गावकर यांना अपयशच आले हे नाकारून चालणार नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले

पुतीच्या आघाडीला फायनान्स कुणाचे?

मायनिंग पीपल्स फ्रंट या गोंडस नावाखाली संघटना उभी करून गल्लीपासून दिल्लीपर्यंत आंदोलन करणाऱ्या पुती गावकर यांच्या या संघटनेला आर्थिक पाठिंबा सेसा गोवा (वेदांता) कंपनीकडून मिळायचा. या पार्श्वभूमीवर आता या आघाडीला निवडणुकीत कोण फायनान्स करणार, हाही प्रश्न सध्या खाणपट्ट्यात विचारला जात आहे. या निवडणुकीमागेही एखादी खाण कंपनी आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Climate Change: 'या' शहराचं तापमान दोन अंशांनी कमी झालं, पण कसं? गोव्यात असा प्रकल्प राबवणं शक्य आहे का?

Goa Live Updates: केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे गोव्यात स्वागत

Jonty Rhodes: राहण्यासाठी गोवा का निवडला? पर्यटन वादात दक्षिण आफ्रिकेच्या माजी क्रिकेटरने दिलेल्या उत्तराने मने जिंकली

PWD Goa: फक्त एका एक्लिवर मिळणार पिण्याच्या पाण्याचे सर्व अपडेट्स; PDW ची गोवेकरांसाठी नवीन उपाययोजना

Sreejita De: जर्मन नवरा, बंगाली नवरी! प्रसिद्ध अभिनेत्रीने गोव्यात प्रियकरासोबत दुसऱ्यांदा केले लग्न; पाहा Photo

SCROLL FOR NEXT