Goa Mining Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: अठरापैकी सहा खाण लीज सुरू; सरकारला प्राथमिक टप्‍प्‍यात मिळाले सुमारे 400 कोटी

Goa Mining Revenue: खाण खात्‍याने आत्तापर्यंत लिलाव केलेल्‍या १८ पैकी सहा खाण लीज सुरू झालेल्‍या असून त्‍यातून सरकारला पहिल्‍या टप्‍प्‍यात सुमारे ४०० कोटींचा महसूल प्राप्‍त झाला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: ‘‘खाण खात्‍याने आत्तापर्यंत लिलाव केलेल्‍या १८ पैकी सहा खाण लीज सुरू झालेल्‍या असून त्‍यातून सरकारला पहिल्‍या टप्‍प्‍यात सुमारे ४०० कोटींचा महसूल प्राप्‍त झाला आहे. आणखी तीन लीज वन खात्‍याच्‍या परवान्‍यांच्‍या प्रतीक्षेत असून त्‍यातील दोन पुढील तीन ते चार महिन्‍यांत सुरू होतील’’, असे खाण संचालक नारायण गाड यांनी सोमवारी ‘गोमन्‍तक’शी बोलताना सांगितले.

‘‘खाण डंपच्‍या लिलावाआधी खाण खात्‍याने विविध भागांतील खाण लीजच्‍या लिलावाची प्रक्रिया सुरू केली आणि १८ लीजचा ई–लिलाव केला. त्‍यातील सहा लीजवर काम सुरू झालेले आहे. तीन लीजना वन खात्‍याचे परवाने मिळालेले नाहीत. त्‍यामुळे त्‍या अजून सुरू झालेल्‍या नाहीत, परंतु त्‍यातील दोन लीजना पुढील तीन ते चार महिन्‍यांत परवाने मिळतील. त्‍यानंतर त्‍या सुरू होतील’’, असे गाड म्‍हणाले.

‘‘सुरू झालेल्‍या सहा लीजच्‍या माध्‍यमातून सरकारला पहिल्‍या टप्‍प्‍यात ४०० कोटींचा महसूल मिळालेला आहे. पुढील काळात त्‍यात आणखी वाढ होत जाईल. ज्‍यावेळी लिलाव झालेल्‍या अठराही लीज पूर्ण क्षमतेने सुरू होतील, त्‍यावेळी सरकारच्‍या तिजोरीत दोन हजार कोटींपेक्षा अधिक महसूल जमा होईल’’, असेही त्‍यांनी नमूद केले.

दरम्‍यान, एकेकाळी राज्‍याच्‍या अर्थव्‍यवस्‍थेचा कणा असलेला खाण व्‍यवसाय सर्वोच्च न्‍यायालयाच्‍या आदेशामुळे गेल्‍या अनेक वर्षांपासून बंद आहे. त्‍यामुळे त्‍यावर आधारित नागरिकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत होता. याची दखल घेत मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काही वर्षांपूर्वी खाणी कायदेशीर मार्गाने सुरू करण्‍याचा निर्णय घेत, लीजचा लिलाव करण्‍यास सुरुवात केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT