Goa Mining Dainik Gomantak
गोवा

Goa Mine: खोट्या ईआयए अहवालाविरुद्ध ग्रामस्थांचा एल्गार; 'खाण ब्लॉकसाठीची जनसुनावणी रद्द करा'- ग्रामस्थांची मागणी

Goa Mine: अडपाल ग्रामसभा तापली

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Mine: खाणीच्या विषयावरुन डिचोलीतील अडवलपाल पंचायतीची आजची (रविवारी) ग्रामसभा तापली. अडवलपाल खाण ब्लॉकअंतर्गत तयार करण्यात आलेला ‘ईआयए’ (पर्यावरणीय आघात मूल्यांकन) अहवाल खोटा असून तो गाव उध्वस्त करणारा आहे, असा दावा ग्रामस्थांनी केला.

खाणीसाठी निश्चित करण्यात आलेली जनसुनावणी रद्द करा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी ग्रामसभेत केली. तसा ठरावही घेण्यात आला.

मार्च महिन्याच्या 15 तारखेला अडवलपाल खाण ब्लॉकसाठी जनसुनावणी घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे. खाण परीक्षेत्रात येणारी घरेदारे, धार्मिक स्थळे आणि नैसर्गिक जलस्रोत बाहेर काढावीत, अशी मागणीही ग्रामसभेत पुढे आली.

गाव उद्धवस्त करणारा खाण व्यवसाय आम्हाला नकोच. अशी भूमिकाही काही ग्रामस्थांनी मांडली. दरम्यान, सरपंच गजानन पालकर यांच्या अध्यक्षतेखाली अडवलपाल पंचायतीची ग्रामसभा रविवारी पार पडली.

या ग्रामसभेस अन्य पंचसदस्य उपस्थित होते. सरपंच पालकर यांनी स्वागत केल्यानंतर पंचायत सचिवांनी मागील ग्रामसभेचे इतिवृत्त सादर केले.

गाव संकटात:-
खाण व्यवसायामुळे गावातील नैसर्गिक जलस्रोत आधीच नामशेष झाली आहेत. खाण माती घुसून शेती, बागायती धोक्यात आली आहेत. खाणबंदीपूर्वी गावात सुरु असलेल्या खाण व्यवसायामुळे गावातील जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहेत.

शेती-बागायती व्यवसायापासून वंचित व्हावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर आता पुढील 50 वर्षांसाठी खाण व्यवसाय सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

गावातील समस्या आणि प्रश्न अगोदर सोडवावेत, त्यानंतरच गावात खाण व्यावसाय सुरु करण्याबाबतीत विचार व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामसभेत मागणी केली.

खटल्यांचा मुद्दा उपस्थित:-

बेकायदा खाण व्यवसायाला विरोध केल्यामुळे पंधरा वर्षांपूर्वी म्हणजेच 2008 या वर्षी तत्कालीन खाण कंपनीकडून स्थानिक 70 लोकांविरोधात खटला दाखल केला आहे. हा खटला अजून न्यायप्रविष्ट आहे. हा मुद्दा आजच्या ग्रामसभेत पुन्हा उपस्थित झाला. ग्रामस्थांच्या विरोधातील खटले मागे घ्यावेत, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

Goa Island: बेटे आमची, गोव्याला देणार नाही; मालकीसाठी धडपडणाऱ्या कर्नाटकची कोलांटी उडी,केवळ माजाळीजवळील बेटाबाबत वाद

Goa Amar Bandekar Case: किरकोळ कारणावरून हत्या, आता न्यायालयात हिशेब! तिघांविरुद्ध खुनाचा खटला चालणार, दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळला

IPL 2026: Believe Mumbai Indians! 'हिटमॅन'च्या मुंबई इंडियन्सला अजूनही प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याची संधी; 'असा' आहे क्वालिफिकेशनचा फॉर्म्युला

SCROLL FOR NEXT