JBR Stone Private Limited Dainiak Gomantak
गोवा

Pisurle Mineral Block: पिसुर्ले खाण लिलाव प्रक्रियेत 'जेबीआर स्टोन'ची एन्ट्री; हायकोर्टाचा मोठा निकाल; तांत्रिक बिघाडामुळे रखडलेली निविदा स्वीकारण्याचे खाण संचालकांना आदेश

JBR Stone Private Limited: गोव्यातील खाण ब्लॉक १५ (पिसुर्ले खनिज ब्लॉक) च्या लिलाव प्रक्रियेत जेबीआर स्टोन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला सहभागी करून घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिले आहेत.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: गोव्यातील खाण ब्लॉक १५ (पिसुर्ले खनिज ब्लॉक) च्या लिलाव प्रक्रियेत जेबीआर स्टोन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला सहभागी करून घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिले आहेत. या निर्णयामुळे बुधवारी (ता. ६) या खाण ब्लॉकसाठीची आर्थिक निविदा उघडली जाणार आहे.

केंद्र सरकारच्या लिलाव पोर्टलवर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आपली निविदा वेळेत अपलोड होऊ शकली नाही, असा दावा करत जेबीआर स्टोन कंपनीने न्यायालयात धाव घेतली होती. खाण संचालकांनी आपली निविदा स्वीकारावी, अशी मागणी कंपनीने याचिकेद्वारे केली होती. यावर २३ मार्च २०२६ रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने कंपनीला पर्यायी पद्धतीने निविदा सादर करण्याची परवानगी दिली होती.

न्यायमूर्ती वाल्मिकी मिनेझिस आणि न्यायमूर्ती अमित एस. जामसंडेकर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी महाधिवक्ता देवीदास पांगम यांनी सरकारची बाजू मांडली. तांत्रिक निविदा आधीच उघडण्यात आल्या असून त्यामध्ये ‘जेबीआर स्टोन’ तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरली आहे, अशी माहिती महाधिवक्त्यांनी न्यायालयाला दिली.

निर्णय विशिष्ट प्रकरणापुरता

महाधिवक्त्यांच्या विधानाची दखल घेत न्यायालयाने ६ मे २०२६ रोजी आर्थिक निविदा उघडण्याचे निर्देश दिले. तसेच, तांत्रिक अडचणींमुळे देण्यात आलेला हा निर्णय केवळ या विशिष्ट प्रकरणापुरता मर्यादित असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT