CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: राज्यातील खाणी ऑक्टोबरमध्ये सुरु होणार? दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्र्यांना खाणमंत्र्यांचे आश्वासन

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यातील खाणी येत्या ऑक्टोबरमध्ये सुरू करण्यासाठी आता केंद्र सरकार सक्रिय पाठिंबा देणार आहे. केंद्रीय खाणमंत्री जी. किशन रेड्डी यांनी तसे आश्वासन दिले आहे. भविष्यात राज्य सरकारकडून दिल्लीला पाठवल्या जाणाऱ्या प्रस्तावांवर लगेच विचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावरून परतल्‍यानंतर ‘गोमन्तक’ला सांगितले.

ते म्हणाले, एकाचवेळी अनेक मंत्री, आमदार दिल्लीत होते. त्यामुळे माझ्या दिल्ली दौऱ्याकडे राजकीय चष्म्यातून पाहिले जाणे साहजिक आहे. मंत्रिमंडळ फेरबदल एवढ्यात नाही, एवढेच मी आजच्या घडीला सांगू शकतो.

पक्षीय पातळीवर व सरकारी पातळीवर अनेक निर्णय घ्यावे लागतात. पक्षाच्या नेतृत्वाच्या विचारांशी ते निर्णय सुसंगत असावे लागतात. यासाठी नियमित रूपाने संवाद साधावा लागतो. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबत संघटनात्मक व सरकारच्या बाबतीत सविस्तर चर्चा झाली. ती चर्चा काय होती हे आताच सांगता येणार नाही.

विधानसभा अधिवेशन १५ पासून सुरू होणार आहे. ते संपल्यावर काही निर्णयांची अंमलबजावणी करता येणार आहे. त्यावेळीच चर्चा काय झाली व निर्णय काय झाले याची कल्पना येईल.

रेड्डी अनेकदा गोव्यात येऊन गेले आहेत. गोव्यातील पक्ष संघटनेसोबत त्यांनी काम केले आहे. त्यांच्याशी परिचय असल्याने त्यांना गोव्यातील खाण व्यवसायाविषयी सविस्तरपणे सांगणे शक्य झाले.

खाणकामास आता कोणताही अडसर राहिलेला नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ व खाण खात्याने गावातून जाणाऱ्या रस्त्यांची पाहणी केली की खनिज वाहतुकीस परवानगी मिळणार आहे. सहा खाणपट्ट्यांचा लिलाव झाला आहे.

डिचोलीच्या खाणीसाठी वेदान्ताने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. केंद्र सरकारने लिलावपूर्व खनिज पाहणी वेळेत पूर्ण केली. त्यामुळे केंद्रीय खाण मंत्र्यांचे आभार मानण्यासाठी त्यांची भेट घेतली. त्यांनी सहकार्याचे आश्वासन दिले, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासोबत फलदायी चर्चा झाली. शाश्वत अशा स्वरूपाचे खाणकाम करण्यासाठी केंद्र सरकारचा नेहमीच पाठिंबा असेल, असे त्यांना आश्वस्त केले आहे, असे जी. किशन रेड्डी म्हणाले.

शहांशी भेट नाहीच

आसगाव येथील घर मोडतोड प्रकरण राज्यभरात गाजत असताना या दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गृहमंत्री अमित शहा यांची का भेट घेतली नाही, याविषयीचे गूढ कायम राहिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhandari Community In Goa: निवडणुकीची घोषणा होणार? भंडारी समाजाच्या आमसभेकडे सगळ्यांचे लक्ष

Mhadei Water Dispute: 'म्हादई'बाबत चुकीची माहिती नको! नेरसे येथे जलवाहिनीचे काम सुरु नाही

Goa Forward: नोकरभरतीसंदर्भात 'सात दिवसांत' योग्य निर्णय घ्या; गोवा फॉरवर्डची मागणी

Subhash Velingkar: आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वेलिंगकरांच्या अटकेसाठी गोवा पोलिसांची महाराष्ट्रात शोध मोहीम!

खरी कुजबुज: जीत - मायकल आमने सामने

SCROLL FOR NEXT