Puti Gaonkar Dainik Gomantak
गोवा

Goa Mine: खाण अवलंबितांनो निदान आता तरी जागे व्हा! अन् सरकारला जाब विचारा

Goa News: कामगारांनी रस्त्यावर उतरल्याशिवाय आता पर्याय नाही.

दैनिक गोमन्तक

Ponda: स्वतःच्या समस्यांबाबत जोपर्यंत समाज पेटून उठत नाही, तोपर्यंत सरकारला जाग येत नाही. नेमका हाच प्रकार राज्यातील खाण अवलंबितांच्याबाबतीत झाला असून निदान आता तरी जागे व्हा आणि रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारा, खाणी सुरू करणार आहे की नाही, नंतरच स्पष्ट होईल खाणी सुरू करायला सरकार तयार आहे की उदासीन, असे मत कामगार नेते पुती गावकर यांनी फोंड्यातील पत्रकार परिषदेत आज व्यक्त केले.

पुती गावकर म्हणाले की, समाज जागृत असेल आणि एखाद्या समस्या दूर करण्यासाठी सरकारला जाब विचारण्यासाठी जेव्हा रस्त्यावर उतरेल, तेव्हाच अशा समस्यांचा सोक्षमोक्ष लागतो, अन्यथा सरकार निद्रिस्त समाजाला गृहीत धरतात, नेमका तोच प्रकार राज्यातील खाण अवलंबितांच्याबाबतीत झाला असल्यामुळेच आज दहा वर्षे उलटली तरी खाणी सुरू होत नाहीत, असा आरोप पुती गावकर यांनी केला.

समाजाचा वचक हा सरकारवर असायलाच हवा. मुळात गोव्यातील भाजप सरकारला निर्णय घेण्याची धमकच नाही, त्यामुळे तर एकमेकांवर प्रकरण ढकलून हे लोक बाजूला होतात. खाणी सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री आणि सरकारी अधिवक्त्याने खाणी येत्या सहा महिन्यांच्या आत सुरू होतील, असे जाहीर सांगितले होते.

आज सहा महिने पूर्ण झाले तरी अजूनच काहीच झालेले नाही. मुळात या विषयावर गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. खरेच सरकारला खाणी सुरू करायच्या आहेत की नाही, हे आधी स्पष्ट व्हायला हवे. लिलाव करायचा असेल तर त्यासंबंधीची कार्यवाही लगेच करा, कुणी अडवले आहे काय तुम्हांला अशी विचारणा करून जोपर्यंत खाणींचे आणि बेरोजगारीचे गांभीर्य सरकारला समजत नाही, तोपर्यंत खाण अवलंबितांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरूच राहील, असे पुती गावकर यांनी सांगितले.

राज्यातील खाणी सुरू होत नाहीत, केवळ आश्‍वासने दिली जातात, तरीही खाण अवलंबित भाजपला पाठिंबा देतात. आपल्या मुलांना सरकारी नोकरी मिळेल, आपले वैयक्तिक काम होईल, या भाबड्या आशेमुळेच कुणी सरकारच्या विरोधात बोलायला धजत नाही, ही वस्तुस्थिती असून आता याबाबत स्पष्टपणे बोललेच पाहिजे, असे पुती गावकरयांनी सांगितले.

सेझा कामगारांना दिलासा...

सेझाच्या 114 कामगारांना येत्या 5 ऑक्टोबरपर्यंत काढून टाकण्यासंबंधी केंद्र सरकारने मंजुरी द्यावी. यासाठी संबंधित कंपनीने प्रयत्न केले होते. खाण कामगारांचे म्हणणे काय ते ऐकून घ्या आणि नंतरच योग्य तो निर्णय घ्या, असे उच्च न्यायालयाने स्पष्टपणे बजावल्याने सध्या तरी सेझा कामगारांना दिलासा मिळाल्याचे पुती गावकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT