Mine Dainik Gomantak
गोवा

Goa Mine: मुळगावात जलसंकट! खाणीतील गाळ तळ्यात साचल्याने जलस्त्रोत बंद होण्याची वेळ, ग्रामस्थ संकटात

Goa Mine: प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाहणी : तपासणीसाठी पाण्याचे नमुने गोळा

Ganeshprasad Gogate

Goa Mine: मायनिंगमुळे अर्थप्राप्ती होत असली तरी त्याचे दुष्परिणाम खाण क्षेत्रालगतच्या ग्रामस्थांना सहन करावे लागत असल्याच्या घटना निदर्शनास येत आहेत. खनिज खाणीमुळे मुळगाव येथील तळे संकटात आले असून तळ्याची मंगळवारी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाहणी करण्यात आली.

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या तळ्यातील पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी गोळा करण्यात आले आहेत. गेल्या 25 फेब्रुवारी रोजी झालेल्या पंचायतीच्या ग्रामसभेत तळ्याचा विषय चर्चेत आला होता.

खाणपीठातील पाणी आणि खाणीवरील गाळ तळ्यात सोडण्यात येत असल्याने तळ्याचे अस्तित्व धोक्यात आल्याची भीती ग्रामस्थांनी ग्रामसभेत व्यक्त केली होती.

गावचे वैभव असलेल्या तळ्याचे अस्तित्व टिकून राहावे, अशी मागणी करतानाच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या तळ्याची पाहणी करावी, असा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला होता. त्यासाठी 12 मार्च हा दिवसही निश्चित करण्यात आला होता.

ग्रामसभेत ठरल्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मुळगाव येथील नैसर्गिक तळ्याची पाहणी करण्यात आली.

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कनिष्ठ अभियंता प्रथमेश देसाई आणि साहाय्यक अनिल परब यांच्या उपस्थितीत झालेल्या या पाहणीवेळी मुळगावच्या सरपंच तृप्ती गाड, उपसरपंच गजानन मांद्रेकर, अन्य पंचसदस्य, देवस्थान समितीचे अध्यक्ष वसंत गाड, शेतकरी संघटनेचे प्रकाश परब, कोमुनिदाद संस्थेचे रामकृष्ण परब, माजी सरपंच गोविंद मांद्रेकर, समाजकार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांच्यासह विविध ग्रामसंस्थांचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही - मुख्यमंत्री स्पष्टच बोलले!

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

Maharashtra Election Holiday: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानासाठी गोवा सरकारची भरपगारी सुट्टी; आदेश जारी

Mapusa: बेकायदा नोकरभरतीवरून म्‍हापसा पालिका बैठक तापली; 20 पैकी 11 नगरसेवकांचे ‘वॉक आऊट’

SCROLL FOR NEXT