Milk Rate Issue Dainik Gomantak
गोवा

Milk Rate Issue: "दूधाचे दर वाढवा, अन्यथा आम्ही...!" दूध उत्पादक आक्रमक; दिला 8 दिवसांचा अल्टिमेटम

Milk Rate: दूध उत्पादकांना वाचवायचे असेल तर दुधाच्या खरेदी दरात वाढ करा, अशी मागणी करीत दूध उत्पादकांनी केली.

गोमंतक ऑनलाईन टीम

फोंडा: राज्यातील दूध उत्पादक अडचणीत आले असून नऊ महिन्यांपासूनचा दरफरक थकला आहे, दूध उत्पादकांना वाचवायचे असेल तर दुधाच्या खरेदी दरात वाढ करा, अशी मागणी करीत दूध उत्पादकांनी बुधवारी गोवा डेअरीच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष पराग नगर्सेकर यांना निवेदन दिले. यावेळी दूध उत्पादक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. दूध उत्पादकांनी मागणी मान्य करण्यासाठी आठ दिवसांची मुदत दिली आहे. अन्यथा, आम्ही पुढील विचार करू, असे दूध उत्पादक म्हणाले.

पत्रकारांशी बोलताना संजीव कुंकळ्येकर म्हणाले की, आज दूध उत्पादक संकटात आहे. पारंपरिक दूध उत्पादकांना सावरण्यासाठी गोवा डेअरीने दूध उत्पादकांना आवश्‍यक सहकार्य करण्याची गरज आहे.

दूध उत्पादकांचा दरफरक गेल्या नऊ महिन्यांपासून थकला आहे, तो आधी दूध उत्पादकांच्या हाती द्या, अशी मागणी करताना दूध उत्पादकांच्या समस्या सरकारने जाणून घ्याव्यात आणि दिलासा द्यावा, असे त्यांनी सांगितले. दूध उत्पादकांसाठी असलेली कामधेनू योजना दूध उत्पादकांनी मागे लागून पुन्हा सुरू करायला लावली, पण अजून तिचा म्हणावा तसा लाभ दूध उत्पादकांना होत नाही, असे दूध उत्पादकांनी स्पष्ट केले.

अनुप देसाई म्हणाले की, राज्यातील दूध उत्पादक तसेच कृषी उत्पादकांच्या समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. विधानसभा अधिवेशनात दूध उत्पादकांच्या समस्यांबद्दल कुणी आवाज काढत नाही, त्यामुळे आतापर्यंतच्या कोणत्याच सरकारला दूध उत्पादकांचे देणेघेणे काहीच नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बागातील 'त्या' प्रकाराबाबत उत्कंठा वाढली! क्राईम ब्रँचकडून गुन्ह्याची नोंद; व्हिडिओतील टोळक्यापर्यंत पोलिस पोहोचले

VIDEO: "नुसते फटके मारुन चालत नाही!" बाबर आझमचा 'स्लो' खेळ अन् 'फास्ट' उत्तर; सोशल मीडियावर फुटले वादाला तोंड

Bihar Food Poisoning: सत्यनारायणाचा प्रसाद ठरला जीवघेणा! मुजफ्फरपूरमध्ये 100 हून अधिक जणांना अन्नातून विषबाधा; एकाच वेळी अख्खं गाव पडलं आजारी

IPL 2026 Points Table : राजस्थानला नमवून SRH चा गुणतालिकेत धमाका! मोठ्या उलटफेरासह टॉप-5 मध्ये एन्ट्री; मुंबई, चेन्नई आणि कोलकाताची अवस्था बिकट

IPL 2026: उष्णतेचा आयपीएल खेळाडूंवर परिणाम; रोहित शर्मा, विराट कोहली यांनाही त्रास; वाढत्या आर्द्रतेचा फटका

SCROLL FOR NEXT