Goa migrant workers Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway: गोव्यात रेल्वेतून आलेल्या 1104 परप्रांतीयांची तपासणी! कोकण रेल्वे पोलिसांची सुरक्षा मोहिम

Goa migrant workers: गोव्यात येणाऱ्या परप्रांतीय कामगारांची चौकशी मोहीमेअंतर्गत कोकण रेल्वे पोलिसांनी आतापर्यंत एकूण ११०४ जणांची तपासणी केली आहे. ही मोहीम २९ जुलैपासून सुरू करण्यात आली.

Sameer Panditrao

मडगाव: गोव्यात येणाऱ्या परप्रांतीय कामगारांची चौकशी मोहीमेअंतर्गत कोकण रेल्वे पोलिसांनी आतापर्यंत एकूण ११०४ जणांची तपासणी केली आहे. ही मोहीम २९ जुलैपासून सुरू करण्यात आली असून, त्याला कोकण रेल्वे पोलिस ठाण्याचे अधीक्षक हरीश मडकईकर आणि उपअधीक्षक नीलेश राणे यांचे मार्गदर्शन आहे.

पोलिस निरीक्षक राहुल नाईक यांच्या नेतृत्वाखाली, कोकण रेल्वे स्थानकावर उतरलेल्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. प्रवाशांचे आधारकार्ड तपासले जाते, त्यांचा मूळ गावाचा पत्ता, तसेच गोव्यात ते कुठे राहणार आणि कुणाकडे काम करत आहेत याची माहिती देखील पोलिस घेत आहेत.

सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून, गोव्यात येणाऱ्या परप्रांतीय कामगारांची चौकशी करणारी ही मोहीम महत्त्वाची ठरत आहे. पोलिसांनी सांगितले की, गोव्यात सुरक्षा व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे.

दरम्यान, पोलिसांच्या तपासणीमुळे कामगारांना सुरक्षित आणि नियमबद्ध काम करण्याची संधी मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT