Mhaji Bus Scheme Dainik Gomantak
गोवा

Mhaji Bus Scheme: ग्रामीण भागात सार्वजनिक वाहतुकीला देणार बळकटी, रात्री उशिराही सुरू राहणार वाहतूक; CM सावंतांची घोषणा

CM Pramod Sawant On Mhaji Bus Service: संपूर्ण गोव्यातील ग्रामीण भागांत अंतर्गत रस्त्यांवर ‘म्हजी बस’ या योजनेतन सार्वजनिक वाहतक व्यवस्था सुधारण्‍याचा सरकारचा विचार आहे. वाहतक खात्याकडून आराखडा करण्‍यात येत आहे.

Sameer Amunekar

साखळी: संपूर्ण गोव्यातील ग्रामीण भागांत अंतर्गत रस्त्यांवर ‘म्हजी बस’ या योजनेतन सार्वजनिक वाहतक व्यवस्था सुधारण्‍याचा सरकारचा विचार आहे. वाहतक खात्याकडून आराखडा करण्‍यात येत आहे. योजनेद्वारे ग्रामीण भागातील लोकांना, विशेषतः यवुती व महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा, हा हेतू समोर ठेवण्यात आला आहे.

त्यासाठी म्हजी बस अंतर्गत सहभागी होणाऱ्यांना अधिक पैसे द्यावे लागले तरीही सरकार देईल’, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुर्ल येथे एका कार्यक्रमात केली. गोव्यातील आणि ग्रामीण भागांमध्ये अंतर्गत रस्त्यांवर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने अनेक यवुती, महिला, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन विद्यार्थिनींना दोन ते तीन किलोमीटर मुख्य रस्त्यांपर्यंत चालत यावे लागते.

संध्याकाळी किवा रात्री या महिला यवुतींना काळोखातनच चालत आपले घर गठावे लागते. अशा असुरक्षित प्रवासामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्व ग्रामीण भागांमध्ये अंतर्गत रस्त्यांवर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वाढवण्‍यात येईल.

बसचालकांनी कट मारणे सोडावे

सरकारतर्फे ग्रामीण भागात म्हजी बस योजनेतून वाहतूक सोय करण्यासाठी सध्या बसवाल्यांना प्रति किलोमीटर सरकार ३ रुपये देणार असून या बसवाल्यांना प्रवाशांच्या हव्यासापोटी एकमेकांना साईड मारण्याची कोणतीही गरज नाही.

गावातील तसेच इतर भागांमधील लोकांनी आपल्या दुचाकी किंवा चारचाकी जास्त प्रमाणात घेऊन न फिरता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांचा लाभ घ्यावा. त्यामुळे अपघातांचे प्रमाण बरेच कमी होण्यास मदत होईल, असेही मुख्‍यमंत्री म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'पक्षात यायचं तर दरवाजे उघडे आहेत', भाजप प्रदेशाध्यक्षांनी उडवली खिल्ली; काँग्रेसच्या रणनीतीला दिलं झणझणीत उत्तर

IND vs SA: कसोटी मालिकेत टीम इंडियाचा सूपडा साफ! व्हाईटवॉशनंतर गौतम गंभीरला म्हणाला, 'पराभवाची जबाबदारी सगळ्यांची...'

WTC Points Table: भारताच्या 'क्लिन स्वीप'चा पाकिस्तानला फायदा, WTC पॉइंट टेबलमध्ये उलटफेर; दक्षिण आफ्रिकेने मारली बाजी

रस्ते खोदाल तर याद राखा!! PM मोदींच्या दौऱ्यासाठी दक्षिण गोव्यात रस्ते खोदकामावर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल

Baina Dacoity: 6वा मजला, 6 दिवस, 6 आरोपी! 'गोवा पोलिसांनी करून दाखवलं'; बायणा दरोडा प्रकरणी पीडित कुटुंबाला मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT