Goa Medical College Dainik Gomantak
गोवा

Kolkata Doctor Case: कोलकाता लैंगिक अत्याचार आणि हत्याप्रकरणाचे गोव्यातही पडसाद; जीएमसीत विद्यार्थी आणि डॉक्टरांकडून आंदोलनाची हाक!

Goa Medical College: कोलकाता येथील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयातील लेडी डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाने आता जोर पकडला आहे.

Manish Jadhav

कोलकाता येथील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयातील लेडी डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाने आता जोर पकडला आहे. या घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांच्या संघटनेने ‘फेडरेशन ऑफ ऑल इंडिया रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन’ने 12 ऑगस्टपासून संपूर्ण देशात संपाची घोषणा केली होती. याच पार्श्वभूमीवर आता गोव्यातही या घटनेचे पडसाद उमटले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थी आणि डॉक्टरांकडून कोलकाता येथील पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील लैंगिक अत्याचार आणि हत्येविरोधात उद्या (17 ऑगस्ट) आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. यादरम्यान जीएमसीतील ओपीडी बंद ठेवण्यात येणार आहे. यावेळी विद्यार्थी आणि डॉक्टरांकडून आरोपींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, कोलकातामधील (Kolkata) या अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करत करत आहे. तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी गेल्या गुरुवारी पीडित महिला डॉक्टरच्या पालकांची भेट घेतली. यासोबतच सीबीआयने आरजी मेडिकल कॉलेजच्या 5 डॉक्टरांना चौकशीसाठीही बोलावले.

कोलकाता लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरण?

8-9 ऑगस्टच्या रात्री एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरसोबत लैंगिक अत्याचाराची घटना घडली. लैंगिक अत्याचारानंतर पीडितेची हत्या करण्यात आली. डॉक्टर चेस्ट मेडिसिन विभागात एमडीच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी होती. यासोबतच ती कॉलेजमध्येच डॉक्टर म्हणून प्रशिक्षणही घेत होती. ज्या रात्री या महिला डॉक्टरसोबत घृणास्पद कृत्य घडले, त्या रात्री तिने 12 वाजण्याच्या सुमारास तिच्या मैत्रिणींसोबत जेवण केले होते. मात्र त्यानंतर ड्युटीवर असताना तिच्यावर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली.

अटक आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी

आरोपीच्या अटकेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी सीबीआय (CBI) चौकशीची मागणी केल्यास आपण त्यास पाठिंबा देऊ, असेही त्या म्हणाल्या होत्या. सीबीआय चौकशीस त्यांचा आक्षेप नाही. त्या म्हणाल्या होत्या की, "जर विद्यार्थ्यांचा पश्चिम बंगाल सरकारवर विश्वास नसेल, तर ते कोणत्याही तपास संस्थेशी संपर्क साधू शकतात. आमचा कोणताही आक्षेप नाही. हे प्रकरण जलदगती न्यायालयात नेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT