Goa Hospital | Goa Medical College Hospital Dainik Gomantak
गोवा

Goa Medical College: कायम कधी होणार? ‘एमटीएस’ कर्मचारी 10 वर्षांपासून कंत्राटावरचं; नोकरीची सुरक्षा अन् नियमित लाभाची प्रतिक्षा

Goa Medical College staff Job Security: कर्मचाऱ्यांनी (एमटीएस) आपल्या सेवांचे नियमितीकरण करण्याची मागणी करत संचालकांकडे ३ ऑक्टोबर २०२२ रोजी निवेदन सादर केले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या हृदयरोग आणि सीव्हीटीएस विभागात कार्यरत असलेल्या बहुकार्य कर्मचाऱ्यांनी (एमटीएस) आपल्या सेवांचे नियमितीकरण करण्याची मागणी करत संचालकांकडे ३ ऑक्टोबर २०२२ रोजी निवेदन सादर केले. त्यानंतर इतर राज्यातील कर्मचाऱ्यांना कंत्राटी पदावरून कायमस्वरूपी नोकरी देण्यात आली, मात्र अजूनही गोमंतकीय कर्मचाऱ्यांना कंत्राटी तत्वावरच कामाला ठेवले आहे.

३ ऑक्टोबर २०२२ च्या पत्रात एमटीएस कर्मचाऱ्यांनी नमूद केले आहे, ते २०१३-२०१४ पासून विभागात वॉर्ड अटेंडंट म्हणून काम करत असून नंतर अधिक प्रशिक्षण घेतल्याने ‘एमटीएस’ (बहुकार्य कर्मचारी) म्हणून नियुक्त करण्यात आले. गेल्या ८ वर्षांपासून त्यांनी अविरत आणि समर्पित सेवा दिली असूनही त्यांना अजूनही नोकरीची सुरक्षा आणि नियमित लाभ मिळालेले नाही. ही पदे कायमस्वरूपी असल्याने त्यांना नियमित करण्याचा हक्क आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

जाहिरात केलेल्या कायमस्वरूपी ‘एमटीएस’ पदांसाठी अर्ज करून परीक्षा देऊनही अद्याप कोणताही नियुक्ती पत्र प्राप्त झालेले नाही, असेही त्यांनी पत्रात स्पष्ट केले. कर्मचाऱ्यांनी विभागाच्या स्थापनेपासून त्यांची प्रामाणिक आणि समर्पित सेवा दिली आहे. त्यांनी संचालकांना त्यांच्या नियमितीकरणासाठी अर्ज विचारात घेण्याची आणि आवश्यक कारवाई करण्याची विनंती २०२२ वर्षापासून केली आहे. निवेदनाच्या प्रती आरोग्य मंत्री विश्वजित राणे, मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आरोग्य सचिव यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.

विजय सरदेसाई यांनी या मुद्द्यावर अधिवेशनात म्हटले होते, हे कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अविरत सेवा देत आहेत. त्यांनी महामारीच्या काळातही अहोरात्र काम केले. अशा परिस्थितीत त्यांच्या सेवांचे नियमितीकरण करणे, ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे.

परिचारिका नियमित!

ज्यावेळी विभाग सुरु करण्यात आला होता, तेव्हापासून आम्ही विभागात काम करत आहोत. हल्लीच येथील परिचारिकांना कामात नियमित करण्यात आले. त्या गोमंतकीय नाही, तरीही त्यांचा विचार सरकारने केला, पण आम्ही गोमंतकीय असून आमचा विचार होत नाही, अशी खंत बहुकार्य कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Goa Live News: गणेश मूर्ती तयार करण्याचे का पुढील ४-५ दिवसांत काम पूर्ण होण्याच्या मार्गावर

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

Ponda: बनावट दाखला प्रकरण! नगरसेवकाला जामीन; काँग्रेसची सखोल चौकशीची मागणी

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT