Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

GMC Goa: शस्त्रक्रिया क्षेत्रात पुढचे पाऊल! ‘गोमेकॉ’त लवकरच ‘Robotic Surgical Unit’; आरोग्यमंत्री राणेंनी दिली माहिती

Robotic Surgical Unit GMC: गोवा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये (गोमेकॉ) लवकरच अत्याधुनिक रोबोटिक सर्जिकल युनिट सुरू होणार असून या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रिया क्षेत्रात क्रांती होणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Robotic Surgical Unit at GMC

पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये (गोमेकॉ) लवकरच अत्याधुनिक रोबोटिक सर्जिकल युनिट सुरू होणार असून या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रिया क्षेत्रात क्रांती होणार आहे. यामुळे रुग्णांना कमीत कमी प्रक्रियेच्या माध्यमातून अचूक आणि लवकर उपचार शक्य होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

या रोबोटिक सर्जिकल युनिटच्या मदतीने अत्यंत अचूक शस्त्रक्रिया करता येणार आहेत. यामुळे रुग्णांचा त्रास होणार असून लवकर उपचारांती घरी परतता येणार आहे. तसेच हे युनिट आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट नमुना ठरणार आहे.

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले की, गोव्याला जागतिक दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार सतत प्रयत्नशील आहे.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात या रोबोटिक युनिटची स्थापना केल्यावर वैद्यकीय संस्थांमध्ये गोवा देशातील सर्वांत प्रगत राज्य ठरणार आहे. गोमंतकीयांसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असून आरोग्यसेवेमध्ये नवीन उंची गाठण्यासाठी आम्ही वचनबद्धता अधोरेखित करते.

‘गोमेकॉ’ देशात आदर्श उपचार केंद्र ठरणार!

या नवीन कल्पनेमुळे गोवा वैद्यकीय महाविद्यालय हे केवळ गोव्यातच नव्हे तर देशभरातील रुग्णांसाठी एक आदर्श उपचार केंद्र ठरणार आहे. गोव्याच्या आरोग्यसेवेच्या क्षेत्रातील हा मोठा टप्पा असून, भविष्यात आणखी नव्या सुविधा उभारण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील असेही आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

SCROLL FOR NEXT