Goa Fishing Dainik Gomantak
गोवा

Goa Fishing: 'आमच्यावर उपासमारीची वेळ येईल'! मच्छिमारांचा दावा; यांत्रिकी बोटींकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आरोप

Goa Fishing Boats: यांत्रिकी बोटींना एलईडी लाईटही लावली आहे, अशी माहिती मच्छीमार जुझे फर्नांडिस यांनी दिली. ही स्थिती अशीच राहिली तर मासेमारी करण्यासाठी लहान बोटी समुद्रात नेणे कठीण होईल.

Sameer Panditrao

Goa News : यांत्रिकी मासेमारी बोटींकडून किनारी मच्छिमारी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे पारंपरिक मच्छिमारांकडून सांगण्यात येत आहे. एरव्ही यांत्रिकी बोटींना समुद्र किनाऱ्यापासून २०० मीटर आत येण्यास मनाई आहे. तरीसुद्धा या बोटी आत येऊन मासेमारी करतात. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची पाळी येईल, अशी भीती पारंपरिक मच्छीमार व्यक्त करू लागले आहेत.

नियमांचे उल्लंघन होत असतानाही मत्स्य व्यवसाय संचालनालयाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

यांत्रिकी बोटींना एलईडी लाईटही लावली आहे, अशी माहिती मच्छीमार जुझे फर्नांडिस यांनी दिली. ही स्थिती अशीच राहिली तर मासेमारी करण्यासाठी लहान बोटी समुद्रात नेणे कठीण होईल.

शिवाय आमच्या जाळ्याला मासेसुद्धा जास्त लागणार नाहीत, असे एलिस्टन पिंटो यांनी सांगितले. मत्स्य व्यवसाय खात्याने याची दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी दुमिंग रॉड्रिग्स यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT