Fuel Leak Issue Dainik Gomantak
गोवा

Fuel Leak Issue: लिकेज सापडल्याचा दावा म्हणजे लोकांच्या डोळ्यात धूळफेक; घटनेबाबत पंच, स्थानिक आक्रमक

Fuel Leak Issue: कंपनी म्हणतेय इंधनगळतीची जागा सापडली, मात्र स्थानिकांना अजूनही 'त्या' प्रकाराबाबत संशय

Ganeshprasad Gogate

Fuel Leak Issue: व्हडलेभाट, चिखली-दाबोळी परिसरात झुआरी इंडियन ऑईल कंपनीच्या भूमिगत इंधनवाहिनीला गळती लागलेले ठिकाण अखेर सापडले.

आल्त-दाबोळी येथील वालिस जंक्शनसमोरील इंधनवाहिनीला भेगा पडल्यामुळे इंधन गळती होत असल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीप्रसाद नाईक यांनी दिलीय.

असं असली तरी या घटनेबाबत काही प्रश्न अजूनही उपस्थित होत आहेत. पेट्रोलियम गळतीविरोधात माटवे, दाबोळीच्या पंच नीलम नाईक आणि स्थानिकांनी एक दिवसीय निषेध दर्शवला असून ZOIL गळतीचे खरे कारण लपवून किरकोळ गळती दाखवत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

माटवे, दाबोळीच्या सरपंच नीलम नाईक या प्रकरणाबद्दल शंका उपस्थित केल्या आहेत. गोमंतकीशी बोलताना त्या म्हणाल्या की, कामगार सांगतात की लिकेज सापडले आहे, परंतु खोदकाम केलेल्या जागेवर कुठेही वास नाही तसेच तो भाग पूर्णतः कोरडा आहे.

लिकेज सापडल्याचा दावा करणे म्हणजे लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार आहे. या प्रकारामुळे गावातील लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झालाय.

सदर घटनेवर पेट्रोलियम कंपनीने तोडगा काढण्याचे आश्वसन दिलंय. तसेच कंपनीकडून फ्लो बंद केल्याचे सांगितले जातेय. मात्र त्या मार्गाने जात असताना दुर्गंधी येत असून विहिरीच्या पाण्यात अजूनही पेट्रोलियम पदार्थ येत असल्याचे इथल्या स्थानिकांचे म्हणणे आहे.

गोवा प्रदूषण मंडळ, आरोग्य विभाग पाण्याचे नमुने घेऊन गेले मात्र त्यांच्याकडूनही अद्याप कुठलाही रिपोर्ट आला नसल्याचे स्थानिक सांगत आहेत.

वरिष्ठ पातळीवर घटनेची खोलवर चौकशी करण्याची गरज असून सरकार स्थानिकांच्या प्रश्नांकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही केला जातोय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

SCROLL FOR NEXT