wholesale fish market Dainik Gomantak
गोवा

Margao Fish Market: 13 कोटींचा प्रकल्प झाला 32 कोटींचा! मडगाव मासळी मार्केट अजूनही प्रतीक्षेत, मार्केटला गोमंतकीय साज द्या- विजय सरदेसाई

SGPDA Fish Market Goa: ‘एसजीपीडीए’ने नव्‍याने बांधलेल्‍या होलसेल मासळी मार्केटची सुरुवातीची खर्चाची निविदा १३.५० कोटी रुपये होती. मात्र, या खर्चात वाढ होऊन ती ३२ काेटींपर्यंत पाेहाेचली, असे असतानाही अजूनही या मार्केटचे काम पूर्ण होत नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: ‘एसजीपीडीए’ने नव्‍याने बांधलेल्‍या होलसेल मासळी मार्केटची सुरुवातीची खर्चाची निविदा १३.५० कोटी रुपये होती. मात्र, या खर्चात वाढ होऊन ती ३२ काेटींपर्यंत पाेहाेचली, असे असतानाही अजूनही या मार्केटचे काम पूर्ण होत नाही. तसेच गोव्‍यात हे मार्केट उभारूनही त्‍याला अजून गोमंतकीय साज आलेला नाही, अशी प्रतिक्रिया फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी व्‍यक्‍त केली.

दरम्यान, या मार्केटाच्‍या भिंतीवर जी रंगरंगोटी केली आहे आणि जी चित्रे काढली आहेत ती गोव्‍यातील मच्‍छीमारांची अशी वाटत नाहीत. या मार्केटाला जे ‘मत्‍स्‍यहाट’ म्‍हणून नाव दिले आहे तेही गोमंतकीय असे वाटत नाही. आम्‍हाला हवे असलेले बदल केले गेले नाहीत तर हे मार्केट आम्‍ही सुरू करायला देणार नाही, असा इशाराही सरदेसाई यांनी दिला. या मार्केटात स्‍थानिक मच्‍छीमारांसाठी ठरावीक जागा देण्‍यात यावी, अशीही मागणी विजय सरदेसाई (Vijai Sardesai) यांनी केली.

स्वखर्चाने रंगरंगोटी करू!

हे मार्केट सासष्‍टीमध्‍ये असल्‍यामुळे त्‍याला पूर्णत: गोव्‍याचा साज आला पाहिजे, अशी मागणी मी यापूर्वी केली होती आणि मुख्‍यमंत्र्यांशीही याबद्दल बोललो होतो आणि जाेपर्यंत हा रंग बदलला जात नाही, तोपर्यंत आम्‍ही हे मार्केट सुरू करायला देणार नाही किंवा आमच्‍या पैशांनी आम्‍ही या मार्केटची रंगरंगोटी करू, असे सरदेसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA: 'शतकवीर' क्विंटन डी कॉक! टीम इंडियाविरुद्ध 'असा' विक्रम करणारा पहिला आफ्रिकन खेळाडू

Aquem Fire: आके येथील फास्ट फूड सेंटरला मध्यरात्री भीषण आग; 25 लाखांचे नुकसान, आगीचे कारण अस्पष्ट

Goa Politics: ''पाटकरांनी जबाबदारी घेतली नाही'',वीरेश बोरकर यांचा आरोप; काँग्रेसच्या 'उद्या'मुळे युतीचा खेळ खल्लास

एअरपोर्टवर हायव्होल्टेज ड्रामा! इंडिगोचं विमान अचानक रद्द, संतापलेल्या विदेशी महिलेनं काउंटरवर चढून केला राडा Watch Video

नवरा भाड्याने पाहिजे! पुरुषांची संख्या कमी झाल्याने ‘या’ देशातील महिला त्रस्त; तासावर मोजले जातायेत पैसे

SCROLL FOR NEXT