Adhar Updates Dainik Gomantak
गोवा

Margao News: आधार कार्ड देण्यात राजू नेपाळीचा हात !

Margao News: पोलिसांना सर्व माहिती पुरवली; नगरसेवक आमोणकरांचा दावा

गोमन्तक डिजिटल टीम

Margao News: रुमडामळ हाऊसिंग बोर्ड येथे नेपाळी नागरिकांना ते पाच हजार रुपये आकारून आधार कार्ड तयार करून दिले जाते, अशा आशयाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सगळीकडे एकच खळबळ माजली आहे.

राजू नेपाळी नावाचा एक एजंट या बेकायदेशीर व्यवहारामध्ये सक्रिय असून तोच या नेपाळी नागरिकांना घेऊन मडगावमध्ये येऊन ही आधार कार्ड करून घेतो, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

राजू नेपाळी याचे नाव मी पोलिसांना दिले आहे. पोलिसांनी त्यासंदर्भात कसून चौकशी करावी, अशी मागणी या गोष्टीचा पर्दाफाश करणारे मडगावचे नगरसेवक महेश आमोणकर यांनी केली.

हा राजू नेपाळी उत्तर गोव्यात राहात असल्याची माहितीही मिळाली आहे. यासंदर्भात मायणा-कुडतरी पोलिसांनी चौकशीही सुरू केली आहे. मात्र, त्यांच्या हाताला फारसे काही धागेदोरे लागलेले नाहीत.

नगरसेवक आमोणकर यांनी जो ज व्हिडिओ पोलिसांना दिला, त्यात दोन इसम आपण आधार कार्ड बनवून घेण्यासाठी आलो आहोत आणि आमच्याकडून चार हजार रुपये वसूल केले, असे सांगताना दिसतात.

हे दोन्ही इसम आपण नेपाळचे नागरिक असल्याचे सांगतात. हे दोन इसम कोण, त्याचा आम्ही शोध घेत आहोत.

ते इसम हाती लागले तर त्यांना रुमडामळ येथे कुणी आणले आणि त्यांच्याकडून कुणी पैसे घेतले, याची माहिती मिळू शकेल, असे पोलिस निरीक्षक देसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 19 October 2026: सुवर्णयोग आणि धनलाभाचा दिवस! शारदीय नवरात्रीच्या सोमवारी 'या' राशींचे उजळणार नशीब; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

SCROLL FOR NEXT