Adhar- Pan Card
Adhar- Pan Card Dainik Gomantak
गोवा

Margao News: नेपाळींना आधारकार्ड? प्रकरणाची चौकशी सुरू

गोमन्तक डिजिटल टीम

Margao News: रूमडामळ-हाऊसिंग बोर्ड येथे नेपाळी नागरिकांना चार ते पाच हजार रुपये आकारून आधारकार्ड तयार करून दिले जाते, अशा आशयाचा व्‍हिडियो व्‍हायरल झाल्‍यानंतर सगळीकडे एकच खळबळ माजली आहे.

यासंदर्भात मायणा-कुडतरी पोलिसांनी चौकशीही सुरू केली आहे. मात्र या प्रकरणात अजूनही त्‍यांच्‍या हाताला धागेदोरे लागलेले नाहीत.

मायणा-कुडतरी पोलिस स्‍थानकाचे निरीक्षक अरुण गावस देसाई यांना या संदर्भात विचारले असता, ज्‍या आधारकार्ड ऑपरेटरच्‍या विरोधात हा आरोप होत आहे. तिला आज पोलिस स्‍थानकावर बोलावून आम्‍ही चौकशी केली.

मात्र, ती सांख्‍यिकी खात्‍याने नेमलेली अधिकृत ऑपरेटर असून आपल्‍या कार्यालयाच्‍या बाहेर जर कुणी काही सांगितले असेल तर आपल्‍याला त्‍याची काहीच कल्‍पना नाही, असे तिने पोलिसांना सांगितले.

आधारकार्ड बारकोड स्‍कॅन करून तयार करावे लागते. त्‍यामुळे कुणीही बनावट दाखले घेऊन आल्‍यास आधारकार्डच्‍या सिस्‍टमप्रमाणे कुठलीही माहिती पूर्वी सांख्‍यिकी खात्‍याच्‍या पोर्टलवर नोंद झाली नसल्‍यास आणि दिलेली माहिती न जुळल्‍यास आधारकार्ड तयार होतच नाही, अशी माहिती त्‍या ऑपरेटरने दिल्‍याचे देसाई यांनी सांगितले.

व्‍हिडियोतील दोघांचा शोध जारी:-

मडगावचे नगरसेवक महेश आमोणकर यांनी जो व्‍हिडिओ पोलिसांना दिला होता, त्‍यात दोन इसम आपण आधारकार्ड बनवून घेण्‍यासाठी आलो आहोत आणि आमच्‍याकडून चार हजार रुपये वसूल केले, असे सांगताना दिसतात.

हे दोन्‍ही इसम आपण नेपाळचे नागरिक असल्‍याचे सांगतात. हे दोन इसम कोण त्‍याचा आम्‍ही शोध घेत आहोत.

ते इसम हाती लागले तरच त्‍यांना रुमडामळ येथे कुणी आणले आणि त्‍यांच्‍याकडून कुणी पैसे घेतले याची माहिती मिळू शकेल, असे पोलीस निरीक्षक देसाई यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT