Goa Garbage Dainik Gomantak
गोवा

Goa Garbage: मडगाव रिंग रोड बनले कचऱ्याचे 'डार्क स्‍पॉट'

Goa Garbage: नवीन सांडपाणी चेंबर टाकण्यासाठी करण्यात आलेली मागणी अजूनपर्यंत पूर्ण करण्यात आलेली नाही.

दैनिक गोमन्तक

Goa Garbage: मडगाव शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी संकल्पित केलेले मडगावचे रिंगरोड कचऱ्याचे डार्क स्पॉट बनत आहेत यात आके, पॉवर हाऊस, कोंब या ठिकाणांच्या रिंग रोडचा समावेश असून परिसरात कचऱ्याचा राशी साचल्‍या असून दुर्गंधीयुक्त पाणी रस्‍त्‍यावरून वाहत आहे.

कोंब येथील रिंगरोडवर वाहनचालकांना गेल्या काही दिवसांपासून रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात काळ्या रंगाचे पाणी वाहत असल्याचे दिसत आहे. हे पाणी जवळ असलेल्या सांडपाणी चेंबरमधून नाल्यात वाहून नंतर साळ नदीत जाते.

दरम्यान, या ठिकाणी नवीन सांडपाणी चेंबर टाकण्यासाठी करण्यात आलेली मागणी अजूनपर्यंत पूर्ण करण्यात आलेली नाही. या पाण्यामुळे येथील शेतजमीन नापीक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पॉवर हाऊस जंक्‍शन रस्त्याच्या परिसरातही रस्त्याच्या कडेला रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तींकडून कचरा आणून टाकण्यात येत असल्याने या ठिकाणीही कचऱ्याच्या राशी पडल्याचे दिसून येते. त्‍यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

अशा प्रकारे मडगाव परिसरातील रिंग रोड कचरामय झाल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी स्थनिक प्रशासनाने लक्ष घालून रिंग रोड परिसरातील कचरा हटवून ही जागा सुशोभीत करावी अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT