Girl Born Dainik Gomantak
गोवा

Margao Railway Station: महिलेने दिला रेल्‍वे स्थानकाच्या प्रसाधनगृहात बालिकेला जन्‍म

गुरुवारी पहाटेची घटना : रेल्‍वे पोलिसांनी नेले इस्‍पितळात

गोमन्तक डिजिटल टीम

Girl Born झारखंडहून गोव्‍यात आलेल्‍या एका महिलेने गुरुवारी (ता.७) पहाटे मडगाव रेल्‍वे स्‍थानकाच्‍या प्रसाधनगृहातच एका बालिकेला जन्‍म देण्‍याची घटना घडली.

त्‍यानंतर ही महिला चक्‍कर येऊन खाली पडलेल्‍या अवस्‍थेत पोलिसांना दिसल्‍यावर त्‍यांनी त्‍या महिलेची चौकशी करत पूर्ण घटना जाणून घेतली. नंतर त्‍या महिलेला आणि तिच्‍या नवजात बालकाला दक्षिण गोवा जिल्‍हा इस्‍पितळात दाखल केले.

गुरुवारी पहाटे ३ वाजण्‍याच्‍या सुमारास ही घटना घडली. बुधवारी (ता.६) रात्री १२ वाजता ही महिला आपल्‍या चुलत भावाबरोबर मडगाव रेल्‍वे स्‍थानकावर उतरली होती. त्‍यांना डिचोली येथे जायचे होते.

मात्र, रात्री डिचोलीला जायला कुठलेच वाहन नसल्‍याने त्‍यांनी रेल्‍वे स्‍थानकावरच राहणे पसंत केले. पहाटेच्‍यावेळी त्‍या महिलेच्‍या पोटात कळा येऊ लागल्‍यानंतर तिला आपल्‍याला शौच होते असे वाटून ती प्रसाधनगृहात गेली.

मात्र, तिथेच तिची प्रसूती झाली. एवढ्यात पोलीस तिथे हजर झाले व त्यांनी त्या मायलेकीला इस्पितळात भरती केले. मडगाव वन स्‍टॉप केंद्राच्‍या प्रशासक आवदा व्‍हिएगस यांनी इस्‍पितळात जाऊन त्‍या महिलेची चौकशी केली.

घेरी येऊन पडली खाली

नवजात बालकाला प्रसाधनगृहातच ठेवून ती महिला बाहेर बॅगेत असलेले कपडे आणण्‍यासाठी गेली असता प्रसूतीवेळी येणाऱ्या थकव्‍यामुळे ती घेरी येऊन खाली पडली.

त्यावेळी तेथे पोलिसांनी येऊन तिची चौकशी केली असता, तिने घडलेली घटना पोलिसांना सांगितली, त्‍यानंतर त्‍या महिलेला आणि नवजात बालिकेला उपचारासाठी मडगाव इस्‍पितळात दाखल करण्‍यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT