Goa Marathon | Preyasee Chari Dainik Gomantak
गोवा

Goa Marathon: वय ही केवळ संख्या..पन्नाशीतही मॅरेथॉनमध्ये नंबर वन गोमंतकीय महिला 'प्रेयसी'

Goa Marathon: गोव्याच्या प्रेयसी या आजच्या महिलांपुढे एक आदर्श आहेत.

दैनिक गोमन्तक

Margao: वय ही केवळ संख्या आहे, तुमच्यात असलेली प्रतिभा कधी अपयशी ठरत नाही, प्रतिभा कधीही कालबाह्य होत नाही. जिद्द, चिकाटी व मेहनत या यशाच्या त्रिसूत्रीवर संपूर्ण भारतात मॅरेथॉन, अल्ट्रा रन व ट्रेल रनमध्ये आपला दबदबा निर्माण करीत असलेली गोमंतकीय महिला प्रेयसी च्यारी विक्रम करीत आहे.

52 वर्षीय प्रेयसी च्यारी ही घोगळ-मडगाव येथील असून मॅरेथॉनमध्ये एक अग्रगण्य नाव म्हणून पुढे येत आहे. देशात विविध ठिकाणी होत असलेल्या पूर्ण मॅरेथॉन, अर्ध मॅरेथॉन, अल्ट्रा रन, ट्रेल रन स्पर्धेत विक्रम नोंदविला आहे.

मनात जिद्द असल्यास वयाचे बंधन लागत नाही, हेच त्याने सिद्ध करून दाखविले आहे. पन्नाशी ओलांडल्यावर काहींना गुडघे दुःखी, अंगदुःखी, स्थूलपणा अशा विविध व्याधी सुरू होतात. पण प्रेयसी च्यारी यांनी आपली धडपड सुरू ठेवली आहे. पुरुषांना, युवा वर्गालाही लाजवेल अशी कामगिरी त्या करीत आहेत.

प्रेयसी या आजच्या महिलांपुढे एक आदर्श आहेत. चूल आणि मूल यातच गुंतून न राहता आपल्यामध्ये असलेल्या प्रतिभेचा योग्य उपयोग करीन पारितोषिके प्राप्त करीत आहेत. आजच्या युगात चालणेच कमी झाले आहे, त्यात महिला तर अभावानेच चालतात आणि लांब पल्याचे पळणे तर कॉलेजमधल्या मुलीही करीत नाहीत. तरुणीना लाजवेल अशी कामगिरी प्रेयसी च्यारी यांनी केली आहे.

मॅरेथॉनपटू बनल्या!

प्रेयसी च्यारी यांचा जन्म लोटली येथे झाला. सध्या त्या घोगळ येथे आपल्या कुटुंबासह राहतात. प्रेयसीचे पती व दोन कमावते मुलगे असून ते नेहमीच प्रोत्साहन देतात, असे त्या अभिमानाने सांगतात.

प्रेयसी शालेयस्तरार धावपटू नव्हत्या, केवळ शारीरिक कसरत व्हावी, आरोग्यासाठी त्यांनी चालणे सुरू केले होते. पण अनेकांच्या प्रोत्साहनामुळे त्या मॅरेथॉनपटूबनल्या. तायकांदो शिकविणाऱ्या आंजेला यांचेही त्यांना चांगले सहकार्य प्राप्त झाले. त्या योगातही तरबेज आहेत.

...चोवीस तास धावल्या!

2020 साली मुंबईत स्टेडियमात झालेल्या चोवीस तास धावण्याच्या स्पर्धेत सर्वसामान्य गटात 123 किलोमीटर अंतर पार करून प्रेयसी पहिल्या नंबरवर आल्या. 2019 साली कोल्हापूर येथे झालेल्या अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत जंगल व खडकाळ वाटेवरून धावत च्यारी यांनी सगळ्यांना मागे टाकत 50 किलोमीटर अंतर कापून पहिला नंबर पटकावला.

साताराहिल अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत च्यारी याने पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध केला. तामिळनाडू येथे झालेल्या बायसोन अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत 50 किलो मीटर अंतराच्या स्पर्धेत तिला प्रथम स्थान मिळाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

SCROLL FOR NEXT