Margao News Dainik Gomantak
गोवा

Margao News: ‘बायो मिथेनेशन प्लांट’ तात्पुरत्या स्वरूपात बंद, कामतांचं स्पष्टीकरण; म्हणाले प्लांटमध्ये...

दिगंबर कामत : ‘एसजीपीडीए’ मार्केटचा प्रकल्प देखभालीनंतर पूर्ववत होणार

गोमन्तक डिजिटल टीम

Margao News मडगाव मधील एसजीपीडीए मार्केटमधील 5 टीडीपी बायोमिथेनेशन प्लांट बंद केलेला नाही,असा निर्वाळा आमदार दिगंबर कामत यांनी दिला. यावेळी नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांच्यासह मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर उपस्थित होते.

या प्लांटमध्ये कणयुक्त द्रव साचलेला आहे तो काढण्यासाठी व देखभाल व दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे. देखभाल झाल्यावर तो पूर्ववत सुरु केला जाईल, असे कामत यांनी सांगितले.

मुख्याधिकारी शंखवाळकर यांच्या म्हणण्याप्रमाणे साचलेला कणयुक्त द्रव काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते, सिवरेज खाते व वास्को कचरा प्रक्रिया प्रकल्प यांच्याकडे संपर्क साधण्यात आलेला आहे. मात्र ते कसे प्रतिसाद देतात ते पहावे लागेल.

दरम्यान, सोनसोडो कचरा संदर्भात उच्च न्यायालयाची पुढील सुनावणी 11 सप्टेंबरला आहे. कदाचित त्यावेळी नगरपालिका एसजीपीडीए मार्केटमधील 5 टीडीपी बायोमिथेनेशनचा प्लांट संदर्भात न्यायालयाचे लक्ष वेधणार आहे, असे कळते.

रावणफोंड रेल्वे उड्डाणपुलाच्या संदर्भात बोलताना कामत यांनी सांगितले की, या प्रकल्पाचे काम बंद नाही. कंत्राटदार कामाची व लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव करीत आहे.

पार्किंग इमारतीत रेस्टॉरंट असल्यास गैर काय ?

नगरपालिका इमारतीमागील पार्किंग प्लाझा इमारतीचे बांधकाम लवकरच सुरू केले जाणार असून हे बांधकाम ‘जीसुडा’ मार्फत करण्यात येणार आहे.

या पार्किंग इमारतीत रेस्टॉरंट साठी जागा ठेवणे यात गैर काय आहे असा प्रश्र्न करुन आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले की, रेस्टॉरंटची गरज आहे व त्यातून नगरपालिकेला महसूल प्राप्त होईल.

नगरपालिका इमारतीचे नूतनीकरण, सौंदर्यीकरणाचे काम लवकरच सुरु करण्यात येईल. हे सुद्धा काम जीएसआयडीसी मार्फत केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Case: ड्रग्स प्रकरणात गोव्याचा 'बाबा' आणि 'मुन्ना' चर्चेत; हैदराबादेत अटक केलेल्या तस्कराच्या चौकशीत आंतरराज्य नेटवर्कचा गौप्यस्फोट

Pakistan Airstrike Afghanistan: पाकड्यांचा अफगाणिस्तानवर पुन्हा एअरस्ट्राइक! कुनार अन् पक्तिका प्रांतावर केला बॉम्बवर्षाव; अनेक जण गंभीर जखमी

Goa Crime: मोखर्ड येथे एकाच घरात दोन बहिणींचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह; दुर्गंधी आल्यानंतर उघडकीस आला धक्कादायक प्रकार

RBI New FD Rules: 1 ऑक्टोबरपासून बदलणार एफडीचे नियम! सर्व बँकांसाठी आरबीआयचा 'मास्टरस्ट्रोक'; तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम?

Pond Fish Death Goa: गणपती विसर्जनानंतर कपिलेश्वरी-कवळेच्या तळीत मासे मृत; 'बॉम्बसदृश' फटाक्यांमुळे प्रदूषण झाल्याचा स्थानिकांचा दावा

SCROLL FOR NEXT