Konkan Railway Police  Dainik Gomantak
गोवा

Kokan Railway Police: ‘मूक’ भिकाऱ्याकडे चक्क दोन लाखांचे मोबाईल!

चोरटा जेरबंद : शिमोगा टोळीचा सदस्य

गोमन्तक डिजिटल टीम

Konkan Railway Police Margao Arrested Accused आपण मूक असल्याचे पत्र दाखवून लोकांच्या घरी भीक मागणाऱ्या एकाला कोकण रेल्वे पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले असता त्याच्याकडे चक्क दोन लाख रुपये किंमतीचे ११ चोरीचे मोबाईल सापडले. वरून हा चोरटा मुका नसून चांगला खणखणीत बोलतो, हेही उघड झाले.

या चोरट्याचे नाव ‘गोपी’ असून तो मूळ शिमोगा येथील चोरट्यांच्या टोळीचा सदस्य असल्याची माहिती मिळाली असून या टोळीतील अन्य सदस्य गोव्यात सक्रिय आहेत का, याचा शोध पोलिस घेत आहेत, अशी माहिती कोकण रेल्वेचे पोलिस निरीक्षक सुनील गुडलर यांनी दिली. या चोरट्याकडे पोलिसाना ‘तो मुका असून त्याला मदत करा’ असे लोकांना आवाहन करणारे पत्रही सापडले.

निरिक्षक गुडलर यांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री सदर चोरटा मडगाव रेल्वे स्थानकावर संशयास्पद स्थितीत फिरत असताना रेल्वे पोलिसांनी त्याला हटकले असता तो घाबरून पळू लागला. कोकण रेल्वे पोलिसांनी त्याचा पाठलाग केला.

यात तो चोरटा जमिनीवर कोसळला त्यावेळी पोलिसांनी त्याला जेरबंद केले. कारवाईत आरपीएफच्या रिंकू यादव आणि एस. राठोड या जवानांनी मदत केली.झडती घेतली असता त्याच्याकडे ११ महागडे मोबाईल सापडले.

‘मूक’पत्र दाखवणाऱ्यांपासून सावध!

निरीक्षक गुडलर यांनी दिलेल्या माहितीनुसार हा शिमोगा येथील टोळीचा सदस्य असून लोकांच्या घरी भीक मागण्याासाठी जात असताना या टोळीचे सदस्य आपण मुके असल्याची अशी कागदपत्रे घेऊन जात असत आणि त्यांना भीक देताना लोकांची नजर चुकवून ते त्यांचे मोबाईल व इतर वस्तू लंपास करीत असत.

यापूर्वी पर्वरी पोलिसांनीही अशी पद्धत वापरून चोऱ्या करणाऱ्या टोळीला या पूर्वी अटक केली होती. आता ही टोळी पुन्हा गोव्यात सक्रीय झाली आहे का, याचा शोध आम्हीं घेत आहोत असे गुडलर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Goa Today's News Live: 'कॅश फॉर जॉब प्रकरण'; काँग्रेस युथ पदाधिकाऱ्यांची म्हार्दोळ पोलिस स्थानकावर धडक!

Nagarjuna At IFFI 2024: नागार्जुन यांचा इफ्फीत जलवा! दाखवली नृत्याची झलक; स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाबाबत म्हणाले की..

IFFI 2024: गोमंतकीय फिल्ममेकर्ससाठी खुशखबर! कलाकार, निर्मात्‍यांसाठी विशेष मास्टर्स क्लास; दिलायला यांची माहिती

IFFI 2024: सिनेविश्वातील महिलांच्या सुरक्षेबाबत भूमी पेडणेकरचे मार्मिक विधान, 'पॉवर प्ले आहे पण..'

SCROLL FOR NEXT