किनाऱ्यांवरील गैरप्रकारांविरोधात पर्यटन खाते अलर्ट मोडवर; 420 टाऊट्सवर कारवाई तर मद्य प्राशनप्रकरणी पर्यटकांनाही दंड

पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची विधानसभेत लेखी स्वरूपात माहिती
Rohan Khaunte
Rohan KhaunteDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Assembly Monsoon Session गेल्या एका वर्षात समुद्रकिनाऱ्यावर मद्य प्राशन करणाऱ्या 635 देशी पर्यटकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे तर पर्यटकांना विविध सुविधा देण्याच्या नावाखाली सतावणूक करणाऱ्या 420 टाऊट्सविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

समुद्रकिनाऱ्यावर कोणत्याही प्रकारची अस्वच्छता पर्यटकांकडून केली जाऊ नये, यासाठी पर्यटन सुरक्षा दलाचे कर्मचारी नेमण्यात येणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी विधानसभेत लेखी स्वरूपात दिली आहे.

राज्यातील समुद्रकिनाऱ्यावर फेरीवाले व टाऊट्स यांच्याकडून पर्यटकांची होत असलेल्या सतावणुकीबाबत पर्यटन खात्याने कोणती पावले उचलली आहेत याबाबतचा प्रश्‍न विरेश बोरकर यांनी विचारला होता.

त्याला लेखी उत्तर देताना मंत्री खंवटे यांनी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक पोलिस कर्मचाऱ्यांबरोबर काही पर्यटन वॉर्डनची नेमणूक करण्यात आली आहे. समुद्रकिनाऱ्यावर मद्यप्राशन करण्यास बंदी आहे तरी काही पर्यटन मद्यधुंदपणे मद्य प्राशन करत असतात.

त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. समुद्रकिनारी भागात या पर्यटक पोलिस व वॉर्डन नियंत्रण ठेवत आहेत. दंगामस्ती करणाऱ्या पर्यटकांना ताब्यात घेऊन पोलिसांकडे सुपूर्द करण्यात येते.

समुद्रकिनाऱ्यावर मद्य प्राशन करून दंगामस्ती करणाऱ्या तसेच रस्त्याच्या पदपथावर स्वयंपाक करणाऱ्या पर्यटकांविरुद्ध कारवाईचे ठोस पावले उचलण्यात आली आहेत. पदपथावर स्वयंपाक करताना आढळून आल्यास २ हजार रुपयांचा दंड देण्यात येतो.

एखाद्या टाऊट्सनी पर्यटकांची सतावणूक केल्यास त्यांना २ हजार ते ५ हजारपर्यंत दंड ठोठावण्यात येतो. समुद्रकिनाऱ्यावर अतिरिक्त पर्यटन सुरक्षा दलाची नियुक्ती करून सुरक्षितता अधिक सक्षम करण्यासाठी खात्याने प्रस्ताव सरकारला पाठवला आहे.

जलक्रीडा प्रकरणी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ५५ प्रकरणे नोंद झाली आहेत. या प्रकरणांमध्ये नियमांचे उल्लंघन केलेल्या तीव्रतेनुसार ५ हजार ते ५० हजारापर्यंत दंड ठोठावण्यात आला आहे.

Rohan Khaunte
Goa Assembly 2023: नोंदणी नसलेल्या हॉटेल्सची वीज, पाण्याची जोडणी तोडणार- खंवटे

शॅक्स भाडेपट्टीवर नको!

किनारपट्टीवर शॅक्स ज्यांना पर्यटन खात्याने दिले आहेत, त्यांनाच व्यवसाय करणे अनिवार्य आहे. हे शॅक्स भाडेपट्टीवर दुसऱ्याला व्यवसाय करण्यास देता येत नाही. तपासणी जर ते आढळून आल्यास शॅकधारकाला दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच त्याचा परवाना रद्द करण्यात येईल.

त्याचे शॅक त्वरित मोडण्यात येईल. प्रतीक्षा यादीवर असलेल्या शॅकधारकाला ते शॅक देण्यात येईल. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्या शॅकधारकाची सुरक्षा ठेव रक्कम जप्त करण्यात येईल, असे उत्तर पर्यटनमंत्र्यांनी लेखी स्वरूपात दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com