MLA Venzy Viegas
MLA Venzy Viegas Dainik Gomantak
गोवा

MLA Venzy Viegas : ‘ गोंयच्या नुस्तेकारांचे फेडरेशन’ची स्थापना : वेन्झी

गोमन्तक डिजिटल टीम

MLA Venzy Viegas : सासष्टी,हल्लीच मडगावातील घाऊक मासळी मार्केटमधून पारंपरिक मासळी विक्रेत्यांना हटविण्याच्या निर्णयानंतर सर्व राज्यातील मच्छीमार समाजाने एकत्र येऊन जी आव्हाने आहेत त्यांचा सामना करण्यासाठी "गोंयच्या नुस्तेकारांचे फेडरेशन"ची स्थापना केल्याचे बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगश यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सर्व मच्छीमार समाज एकत्रित आल्याशिवाय कोणतेही प्रश्न सुटणार नाही असे दिसून आल्याने फेडरेशनची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे व्हिएगश यांनी सांगितले.

सध्या ताजी मासळी व बर्फातील मासळी या पैकी एकाची निवड करणे आवश्यक असल्याचेही मत व्हिएगश यांनी मांडले.

याप्रसंगी नीज गोंयचो रांपणकाराचो एकवटचे सेबी फर्नांडिस, खारवी समाज एकवटचे जुझे फर्नांडिस, पारंपरिक मच्छीमारांचा एकवटचे थॉमास रॉड्रिग्स, गोंयच्या रांपणकारांचो एकवटचे आग्नेलो रॉड्रिग्स व बोट मालक संघटनेचे एण्ड्र्यू गुरजांव उपस्थित होते.

या सर्वांनी फेडरेशनला आपली मान्यता दिली.

मच्छीमारांच्या आणखी ही संघटना फेडरेशनमध्ये सामील होतील अशी आशाही व्हिएगश यांनी व्यक्त केली.

एसजीपीडीएच्या बैठकीत नेमके काय घडले याची माहिती देताना व्हिएगश यांनी सांगितले की, उद्यापासून सर्व रांपणकारांची वाहने घाऊक मासळी मार्केटमध्ये घेतली जातील.

तसेच घाऊक मासळी मार्केटमधील परिसरात पेव्हर्स बसविले जाईल. गटार व्यवस्था सुधारली जाईल, त्याची दुरुस्ती केली जाईल. त्यामुळे थर्माकॉलच्या पेट्या या परिसरात फेकणे बंद होईल. त्यावर सुद्धा कडी नजर ठेवण्यातयेणार आहे.

एसजीपीडीएचे सदस्य सचिव बैठकीचा अहवाल तयार करून जे निर्णय घेतले आहेत व उपाययोजना आखली आहे ते उच्च न्यायालयात सादर करणार असल्याचे व्हिएगश यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: चिखलीत इनडोअर स्टेडियमची भिंत कोसळली

Jammu & Kashmir Terrorist Attack: कठुआमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; भारतीय लष्कराचे 4 जवान ठार, 6 जखमी

Nilesh Cabral: निलेश काब्राल यांचा थेट CM पदावरच डोळा?; मंत्रिमंडळ फेररचनेच्या पार्श्वभूमीवर मोठे विधान

Goa Rain Update: राज्यात पावसाचा हाहाकार! कुशावती नदीची पातळी वाढली; पारोडा रस्ता दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली

Mumbai Goa Highway: निवारा शेडविना प्रवाशांचे हाल; पेडणे तालुक्याची समस्या

SCROLL FOR NEXT