Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: मडगावचा प्रसिद्ध दिंडी महोत्सव 1 नोव्हेंबरपासून होणार सुरु

Goa News: दिंडी उत्सव विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: गेली दोन वर्षे कोविडमुळे प्रातिनिधिक स्वरूपात आयोजिण्यात आलेला मडगावचा प्रसिद्ध दिंडी महोत्सव यंदा उत्साहाने साजरा करण्याचा निर्णय श्री हरिमंदिर देवस्थान विश्र्वस्त मंडळाने घेतला आहे. दिंडी उत्सवाचे हे 113 वे वर्ष असून 1 ते 7 नोव्हेंबर असे सात दिवस हा दिंडी उत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे.

दरम्यान, ही माहिती आज मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंडळाचे अध्यक्ष सुहास कामत यांनी दिली. पत्रकार परिषदेला सचिव मनोहर बोरकर, उपाध्यक्ष नीलेश कांदे, संयुक्त खजिनदार योगेश मुंज, सभासद शरद नाईक हे मान्यवर उपस्थित होते.

दिंडी उत्सवाचा शुभारंभ 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी होणार आहे. 2 रोजी सायंकाळी ‘भजन संध्या’चा कार्यक्रम होणार आहे. 3 रोजी सायंकाळी ‘चंद्रभागेच्या तीरी’ हा कार्यक्रम होणार आहे. 4 रोजी सायंकाळी भजनाचा कार्यक्रम होणार आहे.

मुख्य दिवसाचा कार्यक्रम

रविवार, 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी श्री माऊलीची धार्मिक ग्रंथासह श्रींच्या रथात स्थापना, हरिमंदिराच्या व्यासपीठावर पहिली गायन बैठक, दुसरी बैठक बॅंक चौकात व तिसरी बैठक नगरपालिका चौकात होईल.

रात्री श्री दामोदर बोगदेश्र्वर दिंडी पथक (वास्को) आणि गोव्याबाहेरील निमंत्रित वारकरी भजनी मंडळांसह श्री विठ्ठल रखुमाई रथाचे श्री हरिमंदिर येथूून प्रस्थान होईल. तिसरी बैठक झाल्यावर रथ श्री राम मंदिर, श्री दामोदर साल व श्री विठ्ठल मंदिर येथे प्रस्थान होणार आहे.

शेवटचा दिवस

सोमवार, 7 नोव्हेंबर हा दिंडी उत्सवाचा शेवटचा दिवस असून दुपारी श्रींच्या दिंडी रथाचे श्री हरिमंदिरात आगमन व त्यानंतर गोपाळकाला व महाआरती, सायंकाळी पावणी व रात्री सुप्रसिद्ध गायिका सुजाता गुरव (धारवाड) यांच्या गायनाने दिंडी उत्सवाची समाप्ती होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

International Literacy Day: 1950मध्ये टुरिंग टेस्ट सुचवली, यंत्राची बुद्धिमत्ता तपासली गेली; AI साक्षर होणं काळाची गरज

Stone Exhibition: दगडात शोधला 'देव'! पर्येच्या परेशने भरवले अनोखे प्रदर्शन

Sonali Phogat Murder Case: सोनाली फोगाट खून प्रकरणातील आरोपीला विदेशात जाण्याची परवानगी; बायकोचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इंडोनेशियाला जाणार

Goa Postcard Campaign: संत मीराबाई शिल्पाची 31 वर्षे, 5 दिवसात 3184 पोस्टकार्डांचा विक्रम

Goa Sand Mining: महिन्याभरात पाऊस थांबेल, विकासकांची बांधकामे वेग पकडतील; वाळू समस्येचे ‘गँग्रीन’

SCROLL FOR NEXT