Disaster Management Dainik gomantak
गोवा

Goa Disaster Management: 'ते' आपत्ती निवारा केंद्र पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत; दिगंबर कामत म्हणतात, ''येत्या काही दिवसांत....''

आके बाल भवनजवळ उभारणी

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Disaster Management वादळ, भूकंप आणि अन्य आपत्तीच्या वेळी लोकांना राहायला सहारा मिळावा यासाठी केंद्र सरकारच्या योजनेतून मडगाव शहराला आपत्ती निवारा केंद्र मंजूर झाले असले तरी मागची सहा वर्षे या केंद्राचे बांधकाम रखडले आहे.

आके येथील बाल भवनाजवळ बांधण्यात येत असलेल्या आपत्ती निवारा प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असले तरी ते रखडले आहे. या ठिकाणी कोणती अडचण निर्माण झाली आहे याची चौकशी केली असता येत्या काही दिवसांत आपण हे काम पूर्ण करून घेणार, असे स्थनिक आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले.

मडगाव व सभोवतीच्या परिसरात पावसाळ्यात पूर येण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. सात वर्षांपूर्वी खारेबांद या ठिकाणी पावसाळ्यात अनेक घरांत पाणी शिरले होते. त्यामुळे येथील स्थानिकांना फातोर्डा येथील स्टेडियममध्ये स्थलांतरित करण्यात आले होते.

अशी परिस्थिती अधूनमधून उद्भवत असल्याने येथील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आके येथील बाल भवनासमोर आपत्कालीन निवारा प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यामुळे आपद्‍ग्रस्तांना या प्रकल्पात सुरक्षित ठेवण्याची सोय होणार आहे.

हा प्रकल्प तातडीने पूर्ण करावा, अशी मागणी मडगाववासीयांनी केली होती. आता तो पूर्ण होण्याच्या वाटेवर असला तरी या प्रकल्पाचे काम रेंगाळत आहे.

प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर...

मानवनिर्मित आपत्ती ही कोणत्याही प्रकारची असू शकते. ज्यात युद्ध , इमारत कोसळणे, दंगल, दहशतवादी हल्ला, औद्योगिक धोका, चेंगराचेंगरी अशावेळी या प्रकल्पाचा स्थनिकांना लाभ होणार आहे. आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले की, कोरोनाच्या काळात येथील प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू होते आता हा प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT