Environment Conservation: पर्यावरण संवर्धनासाठी वनीकरण : रोहन खंवटे

पर्यटनमंत्री रोहन खंवटे : पर्वरी येथील वृक्षारोपण मोहिमेत मार्गदर्शन
Rohan Khaunte
Rohan KhaunteDainik Gomantak
Published on
Updated on

Porvorim : समाजाला वनीकरणाचे महत्त्व पटवून देताना पर्यावरण संरक्षणासाठी त्याची किती गरज आहे, याबाबत जागृती करण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी मंगळवारी (ता.11) पर्वरी येथे केले. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी वनमहोत्सवासारखे कार्यक्रम आवश्यक असल्याची माहिती त्यांनी दिली.

खंवटे पर्वरी येथील विद्या प्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयीन निसर्ग क्लब, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व पेन्ह द फ्रान्स पंचायतीच्या सहकार्याने आयोजित वनमहोत्सव कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते.

विद्या प्रबोधिनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय वालावलकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भूषण भावे, पेन्ह द फ्रान्स पंचायत सरपंच स्वप्नील चोडणकर, जि.पं. सदस्य कविता नाईक, पंच अखिलेश देसाई, वनाधिकारी व महाविद्यालयाचा प्राध्यापक व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

उपयुक्तता मोठी

महाविद्यालयाजवळील श्री नीळकंठ ब्रह्मेश्वर मंदिरानजीकच्या आवारात खंवटे यांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.

मातीची धूप रोखण्यासाठी व तापमानात स्थिरता आणण्यासाठी वनीकरण आवश्यक असून हवामान बदलाच्या आव्हानाला तोंड देण्याचा तो एक उत्तम पर्याय असल्याचे खंवटे पुढे म्हणाले.

झाडे हवेतील प्रदूषण रोखताना आपल्याला स्वच्छ हवा देतात. आपले जीवन निरोगी राखण्यास स्वच्छ हवा गरजेची आहे. स्वच्छ व हरित पर्वरीचे ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला वनीकरणाची मोहीम गंभीरपणे राबवायला हवी. आपल्या मातृभूमीला स्वच्छ व सर्वांगसुंदर बनविण्यासाठी सगळे एकत्रितपणे कार्य करूया.

- रोहन खंवटे, पर्यटनमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com