Margao News:  Dainik Gomantak
गोवा

Margao News: डॉक्टरांविरुद्धचा 'तो' प्रकार खंडणीसाठी? युवतीचा मित्र पोलिसांच्या रडारवर, प्रकरणाला कलाटणी

नावेली येथील व्यावसायिक दिग्विजीत चव्हाण याच्या विरोधात मडगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Margao News: खारेबांध-मडगाव येथील डॉक्टर प्रकाश अवदी यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार नोंदविण्याच्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे.

ज्या युवतीने विनयभंगाची तक्रार दाखल केली होती, तिच्याच मित्रावर आता मडगाव पोलिसांनी ‘त्या’ डॉक्टरकडून २५ लाखांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली आज गुन्हा नोंद केला आहे.

२७ वर्षीय तरुणीचा मित्र असलेला नावेली येथील व्यावसायिक दिग्विजीत चव्हाण याच्या विरोधात मडगाव पोलिसांनी भा. दं. सं. च्या कलम ३८५ (खंडणी मागणे), ४४८ (बळजबरीने घरात घुसणे), ३४१ (कोंडून ठेवणे) आणि ५०६ (२) (धमकी देणे) या कलमांखाली गुन्हा नोंद केला आहे.

याप्रकरणी डॉ. अवदी यांचे पुत्र पुष्कर यांनी तक्रार दिली असून, १६ ऑगस्ट रोजी रात्री १०च्या सुमारास चव्हाण याने आपल्या वडिलांच्या क्लिनिकमध्ये घुसून त्यांच्यावर आपल्या मैत्रिणीचा विनयभंग केल्याचा आरोप करून त्यांना धमकी दिली.

त्यांना क्लिनिकमध्ये कोंडून ठेवून आपल्याला २५ लाख रुपये द्या; अन्यथा तुमच्या विरोधात पोलिस तक्रार करू अशी धमकी देऊन खंडणी मागितली, असे म्हटले आहे. यासंबंधी मडगाव पोलिस स्थानकाचे निरीक्षक तुळशीदास नाईक यांना विचारले असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

‘त्या’ युवतीचा मित्र असलेला दिग्विजीत चव्हाण हा एक व्यावसायिक असून बाणावली येथे त्याचा टॅटू स्टुडिओ आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत त्याने नावेली मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती.

दरम्यान, या गुन्ह्यामुळे प्रकरणाला नवीन कलाटणी मिळाली आहे. पोलिसांनी आता अधिक काळजी घेऊन चौकशी करावी, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत. दरम्यान, ज्या पीडितेने आपला विनयभंग झाला अशी तक्रार दिली आहे त्या युवतीची जबानी आज मडगाव न्याय दंडाधिकाऱ्यांनी नोंदवून घेतली. या प्रकरणी पोलिस तपास योग्यरीत्या चालू आहे अशी माहिती बायलांचो एकवोटच्या अध्यक्ष आवदा व्हिएगस यांनी व्यक्त केली.

डॉक्टरांसंबंधीचे प्रकरण पोलिसांनी संवेदनशीलतेने हाताळण्याची गरज असते. कारण रुग्णांचा डॉक्टरवर असलेला विश्वास डळमळीत होऊ शकतो. दुसरे म्हणजे कुठल्याही डॉक्टरवर असा आरोप होऊन पोलिसांचा ससेमिरा त्यांच्या मागे लागल्यास उद्या कोणताही डॉक्टर रात्रीच्यावेळी एखाद्या महिलेला तपासण्यास नकार देऊ शकतो. - विवेक नाईक, मडगाव

पोलिसांनी डॉक्टरांविरुद्ध चौकशी करण्यास आमची कुठलीही हरकत नाही, पण गुन्हा सिद्ध होण्यापूर्वी किंवा दिलेल्या तक्रारीत तथ्य आहे की नाही याची शहानिशा करण्यापूर्वी पोलिसांनी त्यांना गुन्हेगारासारखी वागणूक देणे आम्हाला मान्य नाही. अशी वागणूक मिळत असल्याचे दिसून आल्यास उद्या अन्य पुरुष डॉक्टर रात्री अपरात्री महिला रुग्णांना तपासण्यास पुढे येणार नाही. - डॉ. बबिता आंगले, आयएमए मडगाव अध्यक्ष

तपास अधिकारी बदलला

हे प्रकरण हाताळत असताना योग्य ती संवेदनशीलता दाखविली नाही असा ठपका ठेवून या प्रकरणी तपास करणारे उपनिरीक्षक दामू शिरोडकर यांना बदलून ते आता उपनिरीक्षक समीर गावकर यांच्याकडे दिले आहे. उपनिरीक्षक शिरोडकर यांनी डॉक्टरांना चौकशीला बोलावून त्यांना मारण्याची धमकी दिल्याचा आरोप होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

Shravan Somvar 2025: मन:शांती आणि समस्यामुक्तीसाठी श्रावण सोमवार; जाणून घ्या रुद्राभिषेकाचे महत्त्व आणि सोपी पद्धत

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

PM Narendra Modi: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान विष्णूंचे 11वे अवतार!' भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ; सांगितले 'हे' कारण

SCROLL FOR NEXT