Margao Bus Stand Dainik Gomantak
गोवा

Margao Bus Stand: कदंब बसस्थानक 'अल्ट्रा मॉडर्न'च्या प्रतीक्षेत; डेपो व्यवस्थापकाने दिलीय 'ही' माहिती..

दुरवस्थेकडे दुर्लक्ष : नूतनीकरण प्रस्तावास चालना मिळेना

गोमन्तक डिजिटल टीम

Margao Bus Stand मडगाव येथील कदंब बस स्थानक परत एकदा चर्चेत आले आहे. हा बसस्थानक सध्या खड्ड्यांत हरवला आहे. पावसाळ्यात पाणी तुंबून असल्याने खड्डे दिसत नव्हते, आता पावसाळा ओसरल्याने भलेमोठे खड्डे नजरेस पडू लागले आहेत.

खड्ड्यांमुळे बसगाड्या हेलकावे खात पुढे जात असल्याचे दिसते. प्रवाशांना तर फेरीबोट किंवा एखाद्या होडीत बसल्यासारखे वाटते.

या बसस्थानकाचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव असल्याचे आमदार दिगंबर कामत यांनी यापूर्वी जाहीर केले आहे, मात्र अजून काहीही हालचाल झालेली दिसत नाही. मास्टर प्लॅन अंतर्गत या बसस्थानकाचे काम केले जाण्याची शक्यता आहे.

66 लाख खर्चाचे अंदाजपत्रक

मडगाव बस स्थानकाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले तेव्हा डेपो व्यवस्थापकाने सांगितले की, बस स्थानकावरील रस्ते सुधारण्यासाठी 66 लाख रुपयाचे अंदाजपत्रक तयार केले आहे.

मात्र अजून या अंदाजपत्रक मंजुरी मिळालेली नाही. महामंडळाला येथील स्थितीची पूर्ण जाणीव असल्याचेही त्याने सांगितले.

अल्ट्रा मॉडर्न बसस्टॅण्ड...

2011 साली मुख्यमंत्री असताना दिगंबर कामत यांनी अल्ट्रा मॉडर्न बसस्टॅण्डची पायाभरणी केली होती. पण 12 वर्षे लोटली तरी हा प्रकल्प पुढे गेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT