Goa Congress
Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: रॅलीवर टीका करत काँग्रेसने मोदींकडे केल्या 'या' मागण्या; प्रदेशाध्यक्ष म्हणाले कळसा भांडुरा प्रकल्प...

Ganeshprasad Gogate

Goa Congress: मडगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी भाजपाचा राज्यातील कारभार हा भ्रष्टाचाराचा असून उद्या मोदींची होणारी रॅली म्हणजे लोकसभा निवडणुकीचा प्रचार असल्याची टीका केलीय. या पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधान नरेंद मोदींकडे माही मागण्या केल्या आहेत.

पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन करतो की, त्यांनी कर्नाटकच्या कळसा भांडुरा प्रकल्पाच्या डीपीआरला दिलेली मान्यता मागे घेण्याची घोषणा करावी आणि म्हादई वन्यजीव अभयारण्य व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करावे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आमची जीवनदायीनी आई म्हादईची हत्या केली.

गोव्याचे कोळसा केंद्रात रुपांतर करणारे आणि जैवविविधतेने समृद्ध पश्चिम घाट, भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य नष्ट करणारे आणि दक्षिण पश्चिम रेल्वेच्या बाजूने राहणाऱ्या लोकांच्या जीवनमानाचे प्रचंड नुकसान करणारे तीन रेखीय प्रकल्प रद्द करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिर करणे महत्वाचे आहे.

पंतप्रधानांनी दक्षिण आफ्रिकेतून चित्ता आयात केलाय. मात्र अशा आपल्या राज्यातील स्थानिक वाघांचे रक्षण करणे हे गरजेचे असल्याचे पाटकर म्हणाले.

तसेच या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले अमरनाथ पणजीकर यांनी दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस्को सार्डिन्हा यांना विकास भारत रॅलीच्या प्रचारातून बाजूला का करण्यात आले? असा सवाल यावेळी विचारलाय.

दरम्यान उद्या म्हणजेच मंगळवारी 6 फेब्रुवारीला मडगाव येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेन्द्र मोदींच्या सभेसाठी भाजपने जय्य्त तयारी केली असून सुरक्षेवर विशेष भर दिला आहे. मोदी राज्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन करतील.

त्यानंतर मडगावमध्ये त्यांची भव्य सभा होणार आहे. या सभेला सुमारे 50 हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केली आहे.

मोदी ज्या मार्गावरुन प्रवास करणार आहेत त्या राष्ट्रीय महामार्ग 17 च्या हद्दीत येणाऱ्या गावांना गट विकास अधिकाऱ्यांच्यावतीने पंचायतींना मेमो सादर करण्यात आला आहे.

महामार्गावर भटके कुत्रे, गायी येणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच, महामार्गालगत कचरा टाकू नये अशीही सूचना करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ozari Waterfall Trek: GTDC चे रविवारी वजीर धबधब्यावर ट्रेकिंग; कसा असणार प्रवास आणि फी जाणून घ्या

Panjim: आश्‍‍चर्य! पणजीत एकही नाही धोकादायक इमारत, सार्वजनिक बांधकाम खात्‍याचा दावा

अज्ञात युवकांकडून म्हावळींगे गावात 'भू-सर्व्हेक्षण'; संतप्त गावकऱ्यांनी सर्व्हेचे काम रोखले, संशयित ताब्यात

Goa Todays Live Update: राहुल गांधींविरोधात फोंड्यात पोलिस तक्रार!

Bloomberg Billionaires Index: एलन मस्क यांनी पुन्हा दाखवला जलवा, संपत्तीत मोठी वाढ; अदानी-अंबानींच्या संपत्तीत घट

SCROLL FOR NEXT