19 year old youth drowned at Bhatwadi-Nanoda Goa bicholim Dainik Gomantak
गोवा

धक्कादायक! चिरेखाणींमध्ये पोहताना दोन युवक बुडाले

रेवोडा, नानोडा येथील दुर्घटना : शोधासाठी विशेष कॅमेऱ्याचा वापर; एक मृतदेह सापडला

गोमन्तक डिजिटल टीम

रेवोडा येथील चिरेखाणीजवळ पिकनिकसाठी मडगावहून काही युवकांचा गट आला असता, यातील २१ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी (ता.१३) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. राज लोटलीकर (रा. मडगाव) असे मृत युवकाचे नाव आहे.

दरम्यान, नानोडा येथीलही एक युवक आज बुडाला. सहा ते सात जणांचा युवकांचा गट मडगावहून रेवोडा येथे चिरेखाणस्थळी पिकनिकसाठी आला होता. हे युवक पाण्याने भरलेल्या चिरेखाणीत उतरला असता, त्यातील राज लोटलीकर हा युवक पाण्यात बुडाला. यावेळी मित्रांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो सापडला नाही.

कोलवाळ पोलिस व म्हापसा अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह अथक प्रयत्नांनंतर अखेर बाहेर काढला. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

निर्जन स्थळी चिरेखाण

सातजणांचा हा गट मडगावहून पिकनिकसाठी आला होता. मुख्य रस्त्यावरून ही चिरेखाण दीड किलोमीटर आतमध्ये आहे. या खंदकाकडे जाण्यासाठी पुरेशी वाटही नाही. स्थानिकही तिथे जात नाहीत. हे सर्व मित्र चालत चिरेखाणीवर पोहोचले.

ही खाण पोहण्यासाठी असुरक्षित आहे. राजचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. यावेळी खासगी जीवरक्षक बोलावले होते. ही दुर्घटना सकाळी १०.४० च्या सुमारास घडली. परंतु दुपारी २.२० वाजता मृतदेह पाण्याबाहेर काढला.

एकुलता एक पुत्र हरपला

राज लोटलीकर (वय २१ वर्षे) हा  प्रतिभा आणि राजन लोटलीकर यांचा एकुलता एक पुत्र या दुर्घटनेत हरपला. त्याला रिमा, रिचा, रिया या तीन बहिणी. त्यातील रिचा ही विवाहीत आहे. राजन लोटलीकर हे व्यावसायिक तथा नागेश गार्डन्सचे मालक आहेत. राज हा पदवीधर असून वडिलांच्या व्यवसायात मदत करत होता.

तो येथील एका जीमचा भागीदारही होता. मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर कुटुंबीयांच्या स्वाधीन केला जाईल. त्याच्यावर १७ ऑगस्ट रोजी अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.

चिरेखाण मालकावर कारवाईची मागणी

साळ : भटवाडी-नानोडा येथील संतोष शेळके (वय १९) हा युवक आज (रविवारी) भटवाडी येथील एका बंद चिरेखाणीवर पोहायला गेला असता बुडाला. सायंकाळी उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती. त्‍याचा शोध लागलेला नाही.

बेकायदा चिरेखाण चालवून ती पावसाळ्यात उघडी टाकणाऱ्या संबंधित मालकावर कारवाई करावी, अशी मागणी संतप्‍त ग्रामस्‍थांनी केली. स्थानिक आमदारांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

उत्तम जलतरणपटू, तरीही... : बुडालेल्या राजचे पाण्यातील अचूक स्थान शोधण्यासाठी विशेष कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला. हा खंदक खूपच खोल असून गेल्या दहा वर्षांपासून ती विनावापर आहे. राज लोटलीकर हा उत्तम जलतरणपटू होता. तरीही त्याचा बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्यावर सोमवारी गोमेकॉत उत्तरीय तपासणी होईल. सातपैकी चौघेजण पाण्यात उतरले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT